Pune Accident : होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो; बिल्डर पुत्राची पोलिसांना कबुली
Pune Accident : “होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो, पप्पालाही माहिती होतं”, अशी कबुलीच पुण्यात तरुण-तरुणीला पोर्शे कारने चिरडल्यानंतर (Pune Accident) बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दिलीयं. या दुर्देवी घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलायं. या घटनेनंतर पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आलीयं. चौकशीदरम्यान, त्याने मी दारु पिऊन गाडी चालवत असल्याची कबुली दिलीयं. याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी माहिती दिलीयं.
अजित पवार आणि शिंदे सेनेला धोक्याची घंटा, गरज संपेल तेव्हा भाजप…; शरद पवारांचं मोठं विधान
एका रेस्टॉरंटमध्ये बिल्डर पुत्रासह त्याचे काही मित्र पार्टीसाठी गेले होते. यावेळी त्याच्या मित्रमंडळींनी रेस्टॉरंटमध्ये वोडका, व्हिस्की, बिअर आणि जेवणाची ऑर्डर दिली होती. या मित्रमंडळींनी मद्यप्राशन करुन जेवण केलं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत याबाबतचा तपास सुरु केला. या तपासात अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांनी मद्यप्राशन केलं असल्याचं उघड झालंयं. याबाबतचे सीसीटिव्ही फुटेजही समोर आले असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलंय.
पोलिसांंवर दबाव आणल्याचा आरोप फेटाळला :
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, हा आरोप पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेटाळून लावत यावर स्पष्टीकरण दिलंय. अल्पवयीन मुलांच्या केसमध्ये कलम 304A कलम लागू करण्यात येते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आम्ही कलम 304 लागू केले आहे. अल्पवयीन मुलगा असूनही आम्ही त्याच्यावर न्यायालयीन खटला चालवण्याची मागणी न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाकडून मागणी फेटाळण्यात आलीयं. याविरोधात आम्ही याचिका दाखल करणार असल्याचंही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
‘अरे जा ना तिकडे…, तेच घिस पिटं वाक्य..; मतदानानंतर राज ठाकरे पत्रकारांवर चिडले
बिल्डरसह मद्य देणाऱ्यांवरही गुन्हा!
अल्पवयीन मुलाला रेस्टॉरंटमध्ये मद्य देणाऱ्या रेस्टॉरंटसह त्याच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा मद्य घेत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनाही होती. त्याला मद्य पिण्यास परवानगी देण्यात आल्याप्रकरणी वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलायं. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा तपास सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आलंय.
माझ्याकडे लायसन्स नाही…
आपण कोणत्याही प्रकारचे चालकाचे प्रशिक्षण घेतलं नसून माझ्याकडे चालक परवानाही नाही, याबाबत वडिलांना माहिती आहे, तरीही वडिलांनी पोर्शे कार आपल्याला दिली असल्याचं अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितलं आहे. तसेच मित्रांसोबत रात्रीच्यावेळी पार्टी करण्याचीही परवानगी वडिलांनी दिली असल्याचं समोर आलं आहे.