Download App

Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक! पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन…

Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन (sholay style protest)केल्याची घटना शेवगाव (Shevgaon)तालुक्यात घडली. महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप या करत या महिलांनी यावेळी शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना घेराव घातला. त्याचवेळी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी केली. दूषित पाणीपुरवठा (Contaminated water supply)करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.

‘धनंजय मुंडेंनी काकांसोबत जे केलं ते जगाला माहिती’; रोहित पवारांनी कडक शब्दांत सुनावलं

शेवगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक झालेल्या दिसून आल्या. यावेळी महिलांनी 70 फूट उंच असलेल्या टाकीवर पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले. यावेळी प्रशासनाचा निषेध करत पिण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्यात यावा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.

Pune : कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; दीड हजार नागरिकांनी केलं रक्तदान

जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा यावेळी महिलांनी घेतला. शेवगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एका महिन्यात केवळ दोनदा पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप महिलांनी केला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले.

महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत आहे. सध्याची पाण्याची पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली आहे. अनेकदा गटारीचं पाणी पाईपलाईनमध्ये उतरुन हेच पाणी पिण्यास येत आहे. साथीच्या आजारांचा धोका वाढत चालला आहे. यासाठी नगरपरिषदेच्या स्तरावरुन योग्य ती सुधारणा व्हावी.

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा व शेवगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आज 4 डिसेंबरला शहरातील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर जाऊन महिलांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्या मागण्या पूर्ण न झाल्याने आज महिलांनी शोले स्टाईल आंदोलन केले.

Tags

follow us

वेब स्टोरीज