Download App

उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर मैदानात, आज कोपरगावात जाहीर सभा

वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे आज कोपरगाव येथे सभा घेणार आहेत.

Image Credit: letsupp

Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने चांगलीच (Shirdi Lok Sabha Election) चुरस निर्माण झाली आहे. वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे आज कोपरगाव येथे सभा घेणार आहेत. दरम्यान रूपवते यांना मिळणारा मोठा जनप्रतिसाद पाहता प्रतिस्पर्धी असलेले भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्या अडचणी वाढल्या आहे.

लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया ही लवकरच पार पडणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतदानापूर्वी आता उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असतानाच उत्कर्षा रूपवते यांना वंचित कडून उमेदवारी जाहीर झाली. शिर्डी लोकसभेची दुरंगी लढत तिरंगी झाली.

Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर

वंचितच्या रूपवते यांच्या प्रचारासाठी काही दिवसांआधी अॅड. प्रकाश आंबेडकर हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा रूपवते यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. कोपरगाव तालुक्यात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडत उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाघचौरे तर महायुतीकडून सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये सामना होणार होता. यातच वंचितकडून रूपवते यांना उमेदवारी जाहीर झाल्याने लोखंडे आणि वाकचौरे यांचे टेन्शन वाढले.

Shirdi Lok Sabha : उत्कर्षा रुपवतेंचा झंझावाती प्रचार; लोखंडे, वाकचौरे यांना टेन्शन

रूपवते यांनी मतदारसंघांमध्ये वावर वाढवला असून मतदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. नागरिकांचा रूपवते यांना मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीचा सामना होईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहे. नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होईल. त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात याच उत्तर त्याच दिवशी मिळणार आहे.

follow us

वेब स्टोरीज