Download App

Vikhe Vs Shinde : लोकसभा उमेदवारीवरून शिंदे विखेंना डिवचतायत का?, कोण असेल भाजपचा उमेदवार?

  • Written By: Last Updated:

प्रवीण सुरवसे (विशेष प्रतिनिधी)

Ahmednagar Politics : देशासाठी तसेच राज्यासाठी यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे मानले जाते आहे. कारण यंदा लोकसभा (Loksabha Election) तसेच विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे वारे नगर जिल्ह्यात देखील वाहू लागले असून राजकीय नेतेमंडळी निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच रंगणार असे चित्र दिसते आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरु असताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी देखील लोकसभेच्या रिंगणात उडी मारली आहे.

मी ओबीसींसाठी लढणार, पदाची चिंता नाही, त्यांना जाऊन सांगा मला काढायला; भुजबळ आक्रमक 

अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात चांगलंच राजकारण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच गोटातील दोन बड्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगतं की काय? असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण भाजप आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक चममकी पाहायला मिळतात. यातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमधील विखे आणि शिंदे या दोन बड्या नेत्यांमधील संघर्ष जाहिररित्या समोर येऊ लागला आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत. आजवर आपण केलेल्या कामांच्या जोरावर खासदारकीचे तिकीट विखे यांना मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष झाला. त्यानंतर भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी सुद्धा आपण लोकसभेची निवडणूक लढवणारच असं यापूर्वी जाहीर केलंय. त्यामुळे एकाच पक्षात असताना विखे आणि राम शिंदे यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

Saqib Saleem: साकिब सलीमची हटके बीच लाईफ झलक पाहिलीत? पाहा फोटो 

लोकसभेसाठी आपण आग्रही- शिंदे
राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरु होणार आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी अनेक इच्छुक चेहरे समोर येऊ लागले आहे, मात्र हे सगळं सुरु असताना भाजपमध्ये या जागेच्या तिकिटावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. विद्यमान खासदार सुजय विखे पुन्हा एकदा नगर दक्षिणमधून निवडणूक लढवणार तसेच पक्षाकडून विखे यांना तिकीट जाहीर होणार अशी चर्चा रंगात होती. मात्र भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आपण देखील या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून टाकले. शिंदे यांनी ही इच्छा व्यक्त केल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

नगर दक्षिण लोकसभेची जागा भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यता असल्याने या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध BJP अशी लढत पाहायला मिळते. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद विभागली गेलीये. त्यातच अद्याप राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीत कोण उमेदवार असणार याची आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. मात्र हे सगळं सुरु असताना एकाच पक्षात असलेल्या राम शिंदे यांनी उमेवारीची इच्छा जाहीर केल्याने खासदार सुजय विखे यांचे टेन्शन मात्र वाढले आहे.

लोकसभेचे तिकीट कुणाच्या पारड्यात जाणार?
लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे यांच्यासह खासदार सुजय विखे हे देखील जोरदार तयारी करत आहे. नगर दक्षिणमध्ये साखर व डाळीच्या वाटपाच्या माध्यमातून विखे यांनी अप्रत्यक्ष आपल्या लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. गावोगावी जाऊन त्यांनी कामाचा लेखाजोखा मांडला व आपल्या कामाच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा निवडणुकीत मतांसाठी मी आपल्या जवळ येईल, असे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले. मात्र बदलत्या राजकीय समीकरणात नगर दक्षिणेची जागेवरून भाजपातच दोन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच तयार झाली. यामुळे तिकीट कोणाला मिळणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

शिंदे – विखे… तुल्यबळ कोणाचे अधिक
राम शिंदे यांनी नगर जिल्हयाचे पालकमंत्री पद भूषवले असून कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्यात काम पहिले आहे. तर दुसरीकडे सुजय विखे यांची राजकारणाची सुरुवातच 2019 च्या लोकसभेपासून झाली. भाजपात प्रवेश केला अन् त्यांनी 2019 ला खासदारकीला गवसणी घातली. एक उत्कृष्ट खासदार म्हणून देखील ते नावाजले. राजकीय वारसा लाभलेले विखे यांच्या अनेक पिढ्या या राजकारणात असल्याने खासदार विखे हे देखील राजकारणात आगेकूच करत आहे. मात्र आता या परिस्थितीमध्ये खुद्द पक्षातूनच त्यांना आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, लोकसभा लढवण्यासाठी आपणही उत्सुक असल्याची जाहीर विधाने शिंदे करू लागले. त्यामुळं पक्षाकडून नेमकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचं आहे. तसेच राम शिंदे हे खरचं लोकसभा लढवणार की विखेंची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

follow us