Balasaheb Thorat : राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात (Kanchan Thorat) यांच्या भाषणाने सर्वांची दाद मिळवली.
Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेशात ‘भाजप’ की ‘इंडिया’; सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर
या भाषणामध्ये कांचन थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेबांचा स्वभावच उपस्थित समोर मांडला. त्या म्हणाल्या की, साहेब आता 70 वर्षांचे होत आहेत. मी त्यांच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. साहेब जेव्हा मला पाहायला आले. तेव्हा मी त्यांचे पाय पाहूनच त्यांना पसंत केले. त्यांनी माझा चेहरा पाहिला असेल मात्र मी फक्त पायच पाहू शकले. आमचा योगायोग होता म्हणून लग्न जमल. लग्नानंतर वीस वर्ष कधी पिक्चर व नाटकाला सुद्धा नेल नाही. रोज फक्त पाहूणेरावळे हेच करत आले. साहेबांनी मला अमेरिका, दुबई खूप फिरवलं. मात्र ते 30 वर्षानंतर. अशी तक्रार कांचन यांनी केली.
Savani Ravindra : सिम्पल पण क्लासी; काळ्या रंगाच्या साडीत खुललं सावनीचं सौदंर्य
तसेच त्या म्हणाल्या की, साहेबांना वेळच नव्हता. रोज राजकारण ते लोक असच. घरात आले की, चेहरा पडलेला दिसायचा. मात्र कार्यकर्ते आले की, लगेच जायचे व दीड दोन तास बोलत बसायचे. फक्त आपल्या समोर आले की, मी थकलो, झोप येते. हे सुरू व्हायचं. मी जे बोलतेय ते मनातलं आहे. पाठांतर केलेले नाही. मला कुटुंबाने खूप साथ दिली. नंतर मी मैत्रिणींचा ग्रुप बनवला. त्यांनी खूप साथ दिली. त्यामुळे आता काय मला ही साहेबांची आठवण येत नाही.
Vicky Kaushal: शूटिंग दरम्यान सेटवर अभिनेत्याला झाली दुखापत, आता घेतोय अशी काळजी
तर यावर उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले की, माझं राजकरण काम सगळ्यांना माहीत आहे. मात्र सौभाग्यवती कांचनने अनेक किस्से सांगितले. मी आधी जोर्वे गावात राहायचो. वडील आमदार असताना मी वकील झालो. त्यावेळी लग्नाचा विषय आला. मी विचार केला की, आपल्याकडे रोजच इतके पाहुणे कार्यकर्ते येतात. इथ टिकलं कोण? हाच तेव्हा प्रश्न होता. मी महाविद्यालयात असताना मला तिथेच पाहुणे पाहायला आले. एका व्यापाऱ्याने त्यावेळी सांगितल की, चांगला मुलगा आहे. वकील आहे गोरा गोमटा आहे.
‘देशातील 27 टक्के ओबीसी आरक्षण घालवू’, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा घणाघात
मी कांचनला पाहायला गेलो. तिथे त्यांचं घर व मोठ कुटुंब सदस्य पाहूनच ठरवलं ही आपल्याकडे बरोबर जमेल. कोण चालेल आपल्या घरी? ही दूरदृष्टी आणि अचूक निर्णय माझा ठरला. त्यामुळे कटकट नावाचा प्रकार आजपर्यंत नाही. तुमचं तुम्हाला माहीत. अनेकांच्या घरात रोज सुरूच असत. नवरा बिचारा काम करून येतो आणि घरी आले का बायको म्हणते आले का फिरून? तो दमून आलेला असतो आणि असा प्रश्न येतो. जसा तो बागेत फिरायला गेलेला असतो. असा काही त्रास मला नाही. माझा निर्णय बिनचूक ठरला. हे आज कळत.
दरम्यान थोरात यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच आयोजन करण्यात आलं होत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री झालेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात थोरात व तांबे कुटुंबीयांबरोबर पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील निवासस्थानी भेट देत बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.