Download App

रोहित पवारांना धक्का! गटनेता बदलण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार; नगरपंचायतीची सत्ता जाणार?

कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

Rohit Pawar : कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामध्ये अमृत काळदाते यांना गटनेता म्हणून नोंदविण्यातबाबत विनंती करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत गटनेता बदलाबाबत रोहित पवार गटाची असणारी मागणी फेटाळून लावण्यात आली. कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून संतोष मेहत्रे व उपनेते म्हणून सतीश पाटील यांची असणारे नेमणूक कायम ठेवली. या निर्णयामुळे रोहित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयासह आधी घडलेल्या काही घडामोडींमुळे नगरपंचायतीमधील राजकीय गणित पूर्ण बदललं आहे.

सदरच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे रोहित पवार गटाची कर्जत नगरपंचायतीमधून सत्ता जाणार असल्याची बाब निश्चित झाली आहे. हा निर्णय म्हणजे रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे संतोष मेहत्रे यांना गटनेते कर्जत नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावू शकतात. जे नगरसेवक सदस्य कर्जत नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये व्हिप विरोधात मतदान करतील त्यांच्यावर आपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.

विमानाने परत आणलं म्हणजे.. उपकार करत आहात का? रोहित पवारांचा नरेश म्हस्केंना उपरोधिक सवाल

उषा राऊतांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा

कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत (Usha Raut) यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया (DR. Pankaj Asia) यांच्याकडे सोपवला. उषा राऊतांवर नव्या कायद्यानुसार दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, त्याआधीच उषा राऊत यांनी आपला पदाचा राजीनामा दिला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात असलेल्या कर्जत नगरपंचायतीला शिंदे यांनी सुरुंग लावला आहे. रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तब्बल आठ नगरसेवक फोडले होते.

कर्जतमध्ये राजकारण तापलं! सभापती शिंदेंवर आरोप करत नगराध्यक्ष राऊत यांनी राजीनामा दिला

follow us