फोडाफोडीचा व्हायरस पसरतोय, त्यावरही अजितदादा तुम्हीच योग्य ईलाज कराल; रोहित पवारांची टोलेबाजी

Rohit Pawar On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गुरुवारी जामखेड दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या भाषणात कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीचा (Karjat Jamkhed MIDC) उल्लेख केला. काही जण म्हणाले कर्जत-जामखेडला एमआयडीसी आणणार, पण आणली का ? असा सवाल अजितदादांनी केला. त्यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेही व्यासपीठावर होते. त्यावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सविस्तरपणे एक पोस्ट लिहित प्रा. राम शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय.
RBI ची मोठी कारवाई, ‘या’ 3 मोठ्या बँकांवर ठोठावला लाखोंचा दंड
अजितदादा हे परखड आणि स्पष्टवक्ते आहेत, याची प्रचिती काल पुन्हा एकदा जामखेडमध्ये आली. विशेष म्हणजे अजितदादांनी काल तोंडावरच प्रा. राम शिंदे यांची बोलती बंद केली. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी एक दिवस आधी केवळ मतांसाठी कर्जत-जामखेडसाठी ‘खांडवी-कोंभळी’ एमआयडीसी मंजूर करुन आणल्याचं गाजर त्यांनी दाखवलं आणि हुजऱ्यांकडून स्वतःची पाठही थोपटून घेतली होती. पण काल जामखेडमध्ये बोलताना ‘‘कर्जत-जामखेडमध्ये MIDC आली का? नाही आली,’’ या एका वाक्यात प्रा. राम शिंदे यांचा एमआयडीसी आणल्याच्या दाव्याचा फुगा अजितदादांनी एका क्षणात फोडला असा दावा, आमदार रोहित पवार यांनी केलाय.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश; आता कायदेशीर लढाईत रोख व्यवहारांवर ठेवले जाणार लक्ष
कर्जत-जामखेडकरांच्या वतीने माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की, मागच्या टर्ममध्ये पहिल्या अडीच वर्षांतच मी पाटेगाव-खंडाळा येथील एमआयडीसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन घेतली आणि केवळ मंत्र्यांची अंतिम मंजुरी बाकी आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी अनेकदा पाठपुरावाही केला, पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार गेले. त्यानंतर कोणतेही प्रयत्न न करता केवळ श्रेय मिळावे म्हणून टपून बसलेल्या आणि नकारात्मक राजकीय विचारांच्या विषाणूंची लागण झालेल्या काही नेत्यांमुळं ही अंतिम मंजुरी रखडलीय. आपण स्वतः यात घालून ही एमआयडीसी मंजूर केली तर कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. त्यासाठी आपण मदत कराल अशी कर्जत-जामखेडकर म्हणून आम्हाला अपेक्षा आणि विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जत-जामखेडसाठी तुम्ही कोट्यवधी रुपये निधी दिल्याचा उल्लेखही दादा आपण यावेळी केलात. दादा तुम्ही हे खरेच सांगितले आणि मलाही ते मान्य आहे, याबाबत माझ्या कर्जत-जामखेडकरांच्यावतीने मी आपला कायम आभारी आहे. विकासकामांच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करणारे अशी आपली प्रतिमा आहे. त्यामुळं यापुढेही आपण विकासकामांसाठी कोणताही भेदभाव करणार नाहीत, असा विश्वास आहे. याच विश्वासातून माझ्या मतदारसंघात सुरु असलेल्या कर्जत-जामखेडच्या उपजिल्हा रुग्णालयांसाठी निधी, चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं संग्रहालय, घाट, कमानीसाठी निधी, खर्ड्यात सद्गुरु संतश्री गितेबाबा आणि सिद्धसंत श्री सितारामबाबा गडाच्या सुरु असलेल्या विकासकामासाठी निधी, जामखेडच्या आणि कर्जतच्या मी मंजूर करुन आणलेला व पूर्ण केलेल्या एसटी डेपोसाठी पुरेशा एसटी बस आणि मनुष्यबळ यासह इतर कामांसाठीही निधीची गरज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या यंदाच्या तिनशेव्या जयंतीसाठीही भरीव निधी आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी मी आणि काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्याला निवदेने दिली आहेत. त्याचा विचार करुन ही कामं मार्गी लावण्यासाठी तातडीने भरीव निधी मंजूर करावा आणि पुन्हा एकदा कोणताही भेदभाव न करणारे दादा म्हणून आपलं कौतुक करण्याची आणि आभार मानण्याची संधी द्यावी, ही विनंती, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राम शिंदेंवर टीका
एका चांगल्या विचारांतून राजकारण करत असताना अजितदादा आपण कधीही अडवाअडवीचे काम करत नाही. पण अलीकडे माझ्या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करुन आणलेला निधी अडवण्याचा, मंजूर केलेली कामं थांबवण्याचा, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा आणि फोडाफोडी करण्याचा व्हायरस पसरतोय, त्यावरही निष्णात राजकीय डॉक्टर म्हणून अजितदादा तुम्हीच योग्य ईलाज कराल, असा विश्वास आहे.