MIDC अधिसूचना निघणार? रोहित पवार संघर्ष यात्रेत असतानाच राम शिंदे ‘मास्टरस्ट्रोक’ खेळण्याच्या तयारीत

MIDC अधिसूचना निघणार? रोहित पवार संघर्ष यात्रेत असतानाच राम शिंदे ‘मास्टरस्ट्रोक’ खेळण्याच्या तयारीत

नागपूर : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसीची अधिसूचना निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (12 डिसेंबर) कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. (Industries Minister Uday Samant has held a meeting to discuss the issues facing pending Karjat-Jamkhed MIDC notification)

बैठकीवर रोहित पवारांचा आक्षेप :

दरम्यान, बैठकीला आपल्याला आमंत्रित न करण्यात आल्याचा दावा करत कर्जत-जामखेडेचे विधानसभेचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी बैठकीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आमदार राम शिंदे यांच्या सांगण्यावरुनच या बैठकीला आमंत्रित करण्यात आले नसल्याचा दावा करत रोहित पवार यांनी सामंत यांच्यावर राजकीय दबावापोटी आपण दुजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे. आपली ही कृती म्हणजे ‘कुणाशीही आकस बाळगणार नाही किंवा ममत्वभाव ठेवणार नाही,’ या आपण घेतलेल्या शपथेचा सरळसरळ भंग आहे असेही त्यांनी म्हटंले आहे.

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होणार? हायकोर्टाने आयोगाला कडक शब्दांत फटकारले

रोहित पवार संघर्ष यात्रेत असतानाच राम शिंदेंनी डाव साधला :

दरम्यान, रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा आज अखेरचा दिवस आहे. दुपारी एक वाजता नागपूरमध्ये विराट सांगता सभा होणार आहे. त्याचवेळी राम शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ही बैठक घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार आज दुपारी तीन वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांनी सामंत यांना आठ डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात 12 डिसेंबरनंतर ही बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. पण त्यानंतरही सामंत यांनी आज दुपारीच ही बैठक आयोजित केल्याने राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

याचिका नेमकी कशासाठी केली होती तेच ईडीला आठवेना! छगन भुजबळांना मोठा दिलासा

रोहित पवारांचे उद्योगमंत्र्यांना पत्र :

रोहित पवारांनी 8 डिसेंबरला उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले होते. यात गेल्या साडेचार वर्षांत वेळोवेळी पाठपुरावा करुन एमआयडीसीसाठीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया मी पूर्ण करून घेतली आणि आता संबंधित फाईलवर केवळ आपली एक अंतिम स्वाक्षरी बाकी आहे, असे म्हणत या अधिवेशनात तरी हा प्रश्न मार्गी लागावा अशी विनंती केली होती. तसेच अधिसूचना निर्गमित करण्यासाठी येत असलेल्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी आणि अधिसूचना निर्गमित करण्यासाठी उद्योग मंत्र्यांच्या स्तरावर 12 डिसेंबरनंतर बैठक घ्यावी अशी मागणी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube