BJP candidate Sujay Vikhe Asset : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. भाजपचे (BJP) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नगरमध्ये सभा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलाय. उमेदवारी अर्जाबरोबर संपत्तीची विवरणपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात सुजय विखे यांच्या कोट्यवधींची संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहेत.
भाजपसोबत जाण्याबद्दल शरद पवारांचा वादळी खुलासा! म्हणाले, माझा ‘तो’ प्लॅन झाला यशस्वी
सुजय विखे यांनी आपल्या कुटुंबाची संपत्ती जाहीर केलीय. त्यात पत्नी धनश्री व त्यांच्यावर अंवलबून असलेल्या दोन मुलांच्या नावावर असलेली संपत्तीचा उल्लेख करण्यात आलाय. सुजय विखे, त्यांची पत्ती धनश्री व दोन्ही मुले यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकत्रित सुमारे 29 कोटी इतकी संपत्ती आहे. त्यात सुजय विखे यांच्या नावावर शेतजमिन, इतर स्थावर मालमत्ता अशी 12 कोटी 15 लाख 69 हजार 585 ची संपत्ती आहे. तर दहा कोटी 95 लाख इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यात ठेवींची रक्कम, सोने आहेत. तर पत्नी व मुलांकडे स्थावर व जंगम अशी सुमारे सहा कोटी इतकी संपत्ती आहे. धनश्री विखे यांच्याकडे 3 कोटी 88 लाखांची जंगम मालमत्ता आहे. तर 1 कोटी 19 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. सुजय विखे यांच्या मुलांकडे स्थावर व जंगम अशी सुमारे एक कोटींची संपत्ती आहे.
ओमराजेंच्या आरोपानंतर तेरणा रुग्णालयातील उपचार घेतलेले लोकं अर्चना पाटलांच्या गोटात
सुजय विखेंकडे पाच कोटींच्या ठेवी
सुजय विखे यांच्याकडे 1 लाख 54 हजार 692 रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांची पत्नी धनश्री यांच्याकडे 82 हजार 286 इतकी रोख रक्कम आहे. विखे यांच्याकडे मुदत ठेवी, बचत खात्यांमध्ये 5 कोटी 57 लाख रुपये ठेवी आहेत. त्यांच्या कुटुंबाशी निगडीत प्रवरा बँकेच्या अनेक शाखांमध्ये या ठेवी आहेत. तर इतर बँकांमध्ये ठेवी आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 91 लाख 22 हजार 408 रुपये ठेवी आहेत. तर मुलगी व मुलाच्या नावावर 41 लाख 60 हजार 145 व 51 हजार रुपये इतक्या ठेवी आहेत. तर विखे पत्नी-पत्नीने 11 लाख 87 हजार रुपयांची एलआयसी गुंतवणूक केली आहे.
वार्षिक उत्पन्न घटले
सुजय विखे यांनी उमेदवारी अर्जाबरोबर पाच वर्षांच्या उत्पन्नाचे विवरणपत्र दिले आहे. त्यात 2022 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 कोटी 25 लाख 51 हजार इतके होते. ते मागील आर्थिक वर्षात 2023 मध्ये घटले आहे, या वर्षात 1 कोटी 8 लाख 96 हजार इतकी उत्पन्न त्यांनी दाखविले आहे. त्यांच्या पत्नीचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 74 लाख 41 हजार इतके आहे.
एक किलो सोने
सुजय विखे यांच्याकडे 541 ग्रॅम सोने आहे. त्याची बाजारात किंमत 35 लाख 33 हजार इतकी आहे. हातकडे, साखळी, अंगठ्या, ब्रासलेट असे सोने विखेंकडे आहे. तर त्यांच्यापत्नीकडे 690 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्याची किंमत 45 लाख इतकी आहे.
लोणी, नेवाशामध्ये शेतजमिन
सुजय विखे यांच्या नावावर शेतजमिनी, बांधकाम इमारती आहेत. सुजय विखे यांच्या नावावर 26 एकर, पत्नीच्या नावावर 27 एकर शेतजमिन आहे. त्यात काही शेतजमिन वडिलोपार्जित आहेत. त्यांची मूळगावी लोणी बुद्रुक, नेवासा तालुक्यातील बोरगावला शेतजमिन आहे. तर पत्नीच्या नावावर नेवासा तालुक्यातील उस्थळ खालसा व बोरगाव येथे शेतजमिन आहे. त्यातील काही जमिन त्यांनी विकत घेतली आहे. सुजय विखे यांना वारसाप्राप्त 21 एकर जमीन आहे. तर 4 एकर 19 आर शेतजमीन त्यांनी खरेदी केली आहे.
सुजय विखेंवर किती कर्ज
सुजय विखे यांच्या नावावर तीन कोटी 64 लाख 13 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याशी निगडीत प्रवरा सहकारी बँकेच्या लोणी शाखेतून 2 कोटी २४ लाख १३ हजार इतके कर्ज घेतलेले आहे. ते गृहकर्ज आहे. तर अनिशा ट्रेडिंग कंपनीकडून 1 कोटी 40 लाखांचे हात उसणे घेतले आहेत.
एकही गुन्हा नाही, शिक्षण कुठून घेतले ?
सुजय विखे यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही किंवा एकही गुन्हा न्यायालयात प्रलंबित नाही. त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (बेलगाम, कर्नाटक) येथे झाले आहे. तर एम. एसचे शिक्षण हे त्यांच्याच प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुरल मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहे. तर काही शिक्षण डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे येथे झाले आहे.