ओमराजेंच्या आरोपानंतर तेरणा रुग्णालयातील उपचार घेतलेले लोकं अर्चना पाटलांच्या गोटात
Terna Hospital : तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांवरून उस्मानाबाद लोकसभेचे (Osmanabad Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. यामध्ये अर्चना पाटील काही बोलत नसल्या तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी मात्र ओमराजे निंबाळकरांवर जोरदार निशाना साधला आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपानंतर तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले रुग्ण राणा पाटील कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिल्याचं समोर आलं आहे.
अर्चना पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याची विनंती
उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी येथे रविवारी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांची सभा होती. यावेळी तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले काही नागरिक सभास्थळी पोचले आणि त्यांनी आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या. तसंच, एक रुपयाही खर्च न करता नेरुळच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार केले गेले त्याबाबत या रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच, अर्चना पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याची विनंतीही त्यांनी उपस्थितांना केली.
काय म्हणाले होते राणा पाटील
नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर ते दुसरीकडे नेलं हा आरोप विरोधी उमेदवाराकडून केला जातो. मात्र, हे मेडिकल दुसरीकडं नेलं हा आरोप करताना त्याचे पुरावे द्या. जर पुरावे दिले तर मी राजकारण सोडून देईल असं थेट आव्हान राणा पाटील यांनी दिलं आहे. तसंच, हा प्रचंड खोटारडा माणूस आहे असा आरोपही राणा पाटील यांनी यावेळी केला होता.