Loksabha Election : सुजय विखेंचाच विजय होईल, लोकसभेसाठी पंकजा मुंडेंचे विखेंना पाठबळ
अहमदनगर : नुकतीच निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखा जाहीर केल्यात. त्यामुळं नेते मंडळींकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यातच नगर दक्षिणमधून भाजपचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पाठबळ दिले आहे. सुजय यांना माझा आशीर्वाद आहे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.
मोदी सरकारने फक्त कॉंग्रेसची खाती नाही तर देशातील लोकशाही गोठवली; पटोलेंची घणाघाती टीका
पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजप तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील, असं भाष्य केले.
पंकजा या नगर येथे आल्या होत्या. आज सकाळी त्यांनी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासाची वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल, हा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आणि सुजय विखे यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुजय विखे यांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे, असे स्पष्ट करून यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्यावतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले.
तसेच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.