मोदी सरकारने फक्त कॉंग्रेसची खाती नाही तर देशातील लोकशाही गोठवली; पटोलेंची घणाघाती टीका

मोदी सरकारने फक्त कॉंग्रेसची खाती नाही तर देशातील लोकशाही गोठवली; पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole : ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर आयकर विभागाने (Income Tax Department) काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. तेव्हापासून काँग्रेसने (Congress) सातत्याने भाजपवर टीका केली. तर अनेक विरोधी नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली. हाच धागा पकडून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार केवळ काँग्रेसची खाती नाही, तर देशातील लोकशाही गोठवली, अशी टीका पटोलेंनी केली.

धंगेकरांचा कॉंग्रेस नेत्यांवर विश्वास नाही, त्यामुळेच बापटांचा फोटो वापरण्याची वेळ; गौरव बापटांचे टीकास्त्र 

आज नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असतांना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिंमत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांशी हातमिळवणी करून विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही काल ईडीने अटक केली. काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवता येऊ नये, म्हणून कॉंग्रेस पक्षाची खाती गोठवली आहे. मोदी सरकारने फक्त कॉंग्रेसचीच नाहीतर तर या देशातील लोकशाही गोठवली. वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.

Delhi Liquor Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सात दिवसांची ईडी कोठडी 

पुढं बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार हे चीन आणि रशियाच्या मॉडेलनुसार काम करत असून त्यांना देशात एकच पक्ष हवा आहे, त्यांच्या या मॉडेलमध्ये विरोधी पक्षाला स्थानच नाही. भापज विरोधी पक्षांना संपवण्यासाठी सर्व शक्ती वापरत आहेत आणि घटनात्मक संस्था आणि तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहेत. भाजपने काँग्रेसला आर्थिक संकटात टाकण्यासाठी काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवली. विरोधी पक्षांची आर्थिक कोंडी करणं हा भाजपचा कपडी डाव आहे, असंही पटोले म्हणाले.

भारतीय जनता पक्षासह कोणताही राजकीय पक्ष आयकर भरत नाही. असं असतांना आयकर विभागाने केवळ काँग्रेस पक्षावरच कारवाई का केली आणि 11 बँक खाती गोठवली? काँग्रेसप्रमाणे भारतीय जनता पक्षावर कारवाई करण्याचे धाडस आयकर विभागाने का दाखवले नाही, असा सवाल पटोले यांनी केला.

दरम्यान, आता नाना पटोलेंनी केलेल्या टीकेला आता भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube