Sujay Vikhe Patil On Monoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnage Patil) यांनी अचानकपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. यावर बोलताना भाजपाचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी संयम आणि शांतता पाळण्याचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने मनोज जरांगे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे. जरांगे पाटील आज थेट एकटेच पायी सागर बंगल्यावर उपोषणासाठी निघाले आहेत. त्यावर सुजय विखेंनी आपली भूमिका मांडली आहे.
“मी कामाचा माणूस, खासदार निवडून द्या, पुढे जबाबदारी माझी”; इंदापुरात अजितदादांची जोरदार बॅटिंग
सुजय विखे म्हणाले, मनोज जरांगे यांच्या मनात जे काही समज, गैरसमज झाले असतील त्यांनी का असं वक्तव्य केलं त्याची पार्श्वभूमी माहित नाही पण चर्चेनाे मार्ग निघेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा ठराव पारित केलायं
आता काय विषय गैरसमज काय असेल त्यावर चर्चेतून मार्ग निघेल, असा सल्ला विखेंनी जरांगेंना दिला आहे.
तसेच हा घटनाक्रम काय त्याची सर्व माहिती घेऊन मी बोलणार आहे, कोणीतरी गैरसमज करुन दिला आहे. तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतोयं, हे शोधण्याची गरज असून यात तथ्य नाही त्यांची समजूत काढून विषय मार्गी लागेल. हे राजकीय षडयंत्र म्हणत नाही पण चुकीची माहिती त्यांना ते असतील त्यांच्या मतांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून या गोष्टी वाढत असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलं आहे.
‘तुतारी’ची रायगडावर गर्जना ! महाराजांची प्रेरणा घेऊन सेवा करूयात, शरद पवारांची भावनिक साद
संपूर्ण मराठा समाज संयमी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असून त्यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करेन. जरांगेंना मिळालेली माहिती बरोबर की चुकीची याची शहानिशा करुन समाजाला सोबत गेऊन चालणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आहे, शासनाने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे अजून काही मागण्या असतील तर त्यांनी त्या चर्चेच्या माध्यमातून सोडवल्या पाहिजे मनोज जरांगे पाटील आणि समाजानेही शांतता राखली पाहिजे असे आवाहन अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे ते अहमदनगरमध्ये बोलत होते.