“मी कामाचा माणूस, खासदार निवडून द्या, पुढे जबाबदारी माझी”; इंदापुरात अजितदादांची जोरदार बॅटिंग
Ajit Pawar :महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं. पण एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने विकासकामांना खीळ बसली. निधी मिळत नव्हता. नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही नंतर भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्याच आमदारांच्या सह्यांचे पत्रात होते. त्या खोलात मला आता जायचं नाही. आता पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून द्यायचे आहेत. तुम्ही खासदार निवडून द्या. पुढील जबाबदारी मी घेतो. काळजी करू नका, पंतप्रधान मोदींना सांगू की तुम्हाला तुमच्या विचारांचा खासदार निवडून दिला आता आमची कामं मंजूर करा, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरकरांना शब्द दिला.
इंदापूर येथे आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुनेत्रा पवार, जय पवार, दत्ता मामा भरणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले, भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही फक्त तुमच्या पाठबळावर घेतला. त्यामुळे आता भावनिक होऊ नका. आधी ज्यांना साथ द्यायची होती त्यांना दिली. आता विरोधकांत एकवाक्यता नाही. परिस्थिती वेगळी आहे.
Chhagan Bhujbal : “लहान पक्षही मोठे होतात” छगन भुजबळांचा बावनकुळेंना खोचक टोला
मध्यंतरीच्या काळात वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर माझं इथं येणं झालं नव्हतं. पण आज मी तुम्हाला भेटायला आलो. येथे मी मेळाव्यानिमित्ताने येतोय. घरातील प्रचार करून मला बाहेर पडयचंय. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना करायचं. त्यासाठी प्रत्येक खासदार निवडून आला पाहिजे याचा विचार करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
दर पाच वर्षांनी मी विकासकामांत भर टाकत असतो. माझी आताची आणि सुरुवातीची कारकिर्द पाहिली तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. बारामती-इंदापूर हे होमग्राउंड आहे. येथील मतदारांनी मला नेहमीच साथ दिली. 1991 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर मला प्रचंड मतं दिली. जिल्ह्यातील आणखीही संस्था पक्षाच्या ताब्यात दिल्या. मी कामाचा माणूस आहे. मला विकास आवडतो. त्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो. हा भाग मेहनती लोकांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच येथल्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे, असे अजित पवार म्हणाले.
Supriya Sule : बावनकुळेंच्या पोटातलं ओठांवर आलं ‘त्या’ वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी घेरलं
आधीच भाजपबरोबर गेलो असतो तर जास्त वाटा मिळाला असता
राजकारणात कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. 2019 ला विचारसरणी जुळत नसतानाही आपण शिवसेनेबरोबर गेलो होता. मात्र, त्यावेळीही भाजपने आमच्याबरोबर या असं सांगितलं. त्यावेळीच जर त्यांच्याबरोबर गेलो असतो तर दोनच पक्षांचं सरकार राहिलं असतं. सत्तेतही जास्त वाटा मिळाला असता, अशी खंतही अजित पवार यांनी बोलून दाखवली.