Merry Christmas 2023 : ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (Christmas) अर्थात नाताळ हा महत्त्वाचा सण असतो. हा सण दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे, 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिस्ती बांधवांकडून येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात. चर्चमध्ये विविध समारंभाचे आयोजन देखील केले जाते. हा सण ख्रिश्चन धर्मियांसोबत इतर धर्मीय लोकही साजरात करतात. चर्चंला भेटी देतात. दरम्यान, याच निमित्ताने नगर शहरातील ह्यूम मेमोरियल चर्चविषयी (Hume Memorial Church) जाणून घेऊ.
‘पवारांवर परिवादाचं लेबल नव्हतं’ अजितदादांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं सणसणीत उत्तर
अमेरिकन मिशनरींनी मुंबईनंतर नगर शहरात पाऊल टाकले. त्यावेळी गॉर्डन हॉल चर्चममध्ये उपासनेसाठी जागा कमी पडू लागली. त्यामुळे सर रॉबर्ट ऍलन ह्यूम यांच्या पुढाकारातून ह्यूम मेमोरियल चर्चच्या बांधकामास सुरवात झाली. लोकवर्गणीतून 1902 मध्ये ह्यूम मेमोरियल चर्चचे बांधकाम सुरू झाले. हे बांधकाम पाश्चिमात्य व गौथिक पद्धतीने केले आहे. त्यासाठी त्यांनी वांबोरी (ता. राहुरी) व मिरी (ता. पाथर्डी) येथील खाणीतील दगडांचा वापर केला. चर्चच्या छतासाठी सागाचे लाकूड वापरले आहे.
आता स्वतःच्या नावानंतर वडिलांआधी आईचेही नाव लिहावे लागणार! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात लाकडी बाके बसविली. त्यासाठी शिसम लाकडाचा वापर केला. शिसम हे लाकूड दक्षिण भारतातील मलबार येथून रेल्वेने आणले व त्या लाकडांचा बाकासाठी वापर करण्यात आला.
अमेरिकेतील बेल कंपनीकडून भारतात विशेष बनावटीच्या पाच घंटा आणल्या होत्या. पैकी एक घंटा ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये बसविली होती. ही घंटा पंचधातूपासून बनविल्याचे जाणकार सांगतात. घंटेचा आवाज 2 किलोमीटरपर्यंत सहज पोचतो.
सर रॉबर्ट ऍलन ह्यूम यांनी 1902 मध्ये चर्चच्या बांधकामाला सुरवात केली. 1906 मध्ये चर्चचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे 24 ऑक्टोबर 1906 रोजी ह्यूम मेमोरियल चर्च उपासनेसाठी समर्पित करण्यात आले. त्यास 114 वर्षे पूर्ण झाली, तरी चर्च अगदी सुस्थितीत आहे. ह्यूम मेमोरियल चर्चबद्दल लोकांच्या मनात आकर्षण आहे. मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात ह्यूम मेमोरियल चर्चची नोंदणी केलेली आहे. युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया संस्थेंतर्गत ही चर्च कार्यरत आहे.