आता स्वतःच्या नावानंतर वडिलांआधी आईचेही नाव लिहावे लागणार! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आता स्वतःच्या नावानंतर वडिलांआधी आईचेही नाव लिहावे लागणार! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

बारामती : “राज्यात आता स्वतःच्या नावानंतर वडिलांचे नाव लिहिण्यापूर्वी आईचेही नाव लिहावे लागणार आहे, असा मोठा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच सादर केले. यात “महिलांना समान अधिकार मिळावा या उद्देशाने यात हा निर्णय घेण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबतची माहिती दिली. (Shinde government has taken a decision that while writing the name, the mother’s name must also be written.)

बारामती येथील सरपंच- उपसरपंच मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, स्वतःच्या नावानंतर आईचे नाव मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव, अशा पद्धतीने नाव लिहिण्याची पध्दत सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. चौथे महिला धोरण आदिती तटकरे यांनी नुकतेच सादर केले. त्यात महिलांना समान अधिकार मिळावा या उद्देशाने या पुढील काळात वडिलांच्या नावासोबतच आईच्या नावाचा उल्लेख करायचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू

घर महिलेच्या नावावर असल्यास मिळणार शुल्कातून सवलत :

याशिवाय घर खरेदी केल्यानंतर ते जर महिलेच्या नावाने असेल तर शुल्कात एक टक्का सवलत देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुले या पुढील काळात घर महिलांच्या नावावर करून शुल्क सवलतीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube