Download App

मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

Image Credit: letsupp

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील सभेसाठी लोकांची गर्दी गोळा करण्यासाठी सक्ती का? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. दरम्यान, येत्या 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिर्डीत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी सभेसाठी गर्दी जमवण्याबाबतच्या बातम्यांच्या मुद्द्यावरुन बाळासाहेब थोरातांनी भाजपला थेट सवाल केला आहे.

Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out

थोरात म्हणाले, मोदी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत, देशातील सर्वोच्च पदस्थ व्यक्ती जिल्हा दौऱ्यावर येत आहे महत्त्वाचे आहे, मात्र सभेसाठी गर्दी जमवणे याबाबत मी देखील बातम्या वाचल्या मला आश्चर्य वाटलं ही वस्तू स्थिती आहे. नुकताच ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम देखील मोदींच्या उपस्थितीत पार पडला होता.

Tiger 3: कतरिना अन् सलमानचे ‘लेके प्रभु का नाम’ धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मोदींच्या सभेसाठी शैक्षणिक संस्थांचा उपयोग करून घेणे नाही योग्य नाही. पंतप्रधान हे पदच असं आहे की लोक हे सभेसाठी गोळा होणारच मात्र, गर्दी गोळा करण्यासाठी यांना सक्ती करण्याची का गरज भासत आहे, असा सवाल यावेळी थोरात यांनी केला आहे.

रोमहर्षक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय; विराट कोहलीचे शतक अन् विक्रमही हुकला

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यात येणार आहेत. मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आहे. मोदींच्या सभेला मोठी गर्दी जमवण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. त्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शाब्दिक टीका केली आहे.

MPSC मार्फत 378 पदांसाठी बंपर भरती, 9 नोव्हेंबर पर्यंत करता येणार अर्ज

शिर्डी दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडेचे पाणी सोडण्याचा उपक्रम देखील राबवला जाणार आहे. निळवंडे पाण्याच्या मुद्द्यावरुनही थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, निळवंडेचे पाणी सोडले व अवघ्या चार दिवसानंतर ते पुन्हा बंद देखील केले मोदींच्या हस्ते उद्घाटन करायचे असे करणे योग्य नाही. शिर्डी येथील दर्शन रांगेचे उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मात्र, मोदी येत नाही तोपर्यंत दर्शन रांग चालू करायचे नाही तोपर्यंत लोकांनी उन्हात पावसात उभा राहायचं, तोपर्यंत धरणाचे पाणी सोडायचं नाही हे काही योग्य नसल्याचं थोरातांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मोदींना जेव्हा यायचं तेव्हा येऊ द्या मात्र, सर्व गोष्टी सुरू राहू द्या, अशी मागणी आमची असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज