Balasaheb Thorat On Radhakrushna Vikhe : सध्या काही जण व्यवसायिक अन् धंदेवाईक राजकारणी झाले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांचा इतिहासच बाहेर काढला आहे. अहमदनगरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विखे-थोरातांमध्ये नेहमीच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत. आता मात्र, बाळासाहेब थोरातांनी विखेंचा इतिहास सांगत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, पुण्यात आज काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होतं.
“अजितदादांनी तीन वेळा शब्द फिरवला, आता विधानसभेला मदत केली तरच”.. अंकिता पाटलांचा थेट इशारा
बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसने खूप वाईट दिवस पाहिले आहेत. अनेक उड्या मारणारे पाहिलेले आहेत. सध्या काहीजण व्यवसायिक अन् धंदेवाईक राजकारणी झालेत. सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारुन जायचं पुन्हा सत्ता येईल तेव्हा पुन्हा यायचं, सत्ता मिळवायची अन् म्हणायचं आम्ही काँग्रेसमधून आलोयं आम्ही एवढा त्याग केला आहे. आम्हाला मंत्रिपद नाही असं म्हणत रडायचं. पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा यायचं, अशी सडकून टीका बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर केली आहे.
Pune Loksabha : फडणवीस अन् अजितदादांच्या मर्जीतील काकडे यांनीही लावलाय आता जोर!
एक उदाहरण सांगतो 1978 साली एक कुटुंब काँग्रेससोबत नव्हतं. 1980 साली ते आपल्याकडे आले. त्यांना कोणाची हवा हे चांगल कळतं. त्यानंतर पुन्हा 1992 ला गेलं अन् 1995 साली पुन्हा आलं. त्यानंतर 1996 साली पुन्हा बाहेर गेले. मंत्रिपद घेतली परत 2004 साली आपल्याकडे आले, मंत्रिपद, विरोधी पक्षनेते पद घेतलं वेळ आली पुन्हा 2019 ला गेले एवढ्या उड्या मारल्या असल्याचं म्हणत त्यांनी विखेंवर टीका केलीयं.
अशोक चव्हाण जेव्हा भाजपात गेले तेव्हा काँग्रेसचे प्रभारी रमेश चनीथला यांना म्हटलं की, अशोक चव्हाण गेले आहेत पण परत काँग्रेसमध्ये येतील, आत्ता नाही पण आपली सत्ता आल्यावर हा इतिहास आहे. असं सांगितल्यावर ते खूश झाले असल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे. तसेच 2004 सालीही विखेंबद्दल सांगितलं की ते खूप त्रास देतात, त्यांना आदर्श नाही त्यांना कशाला घेता. त्यावर मला रमेश चनीथला म्हणाले, पक्षाला एका खासदाराची आमदाराची आवश्यकता आहे पक्षाची अवस्था चांगली नाही त्यानंतर विखेंनी काँग्रेसमध्ये घेतलं असल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे.