Constitution Day : संविधान दिनानिमित्त (Constitution Day) येत्या 26 नोव्हेंबरला अहिल्यानगरमधील सीएसआरडी महाविद्यालयात संविधानाचा जागर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर सीएसआरडी महाविद्यालयात प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिलीयं.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे CM? मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आजच दिल्लीत होणार शिक्कामोर्तब
समाजकल्याण विभाग, मानवाधिकार अभियान सीएसआरडी समाजकार्य, संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासोबतच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, वारे सर, यांच्यासह अनेक समाजसेवा कार्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या परिसंवाद कार्यक्रमात संविधानाच्या मुल्यांची जनजागृती आणि चिंतनावर परिसंवाद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन डॉ. सुरेश पठारे यांनी केलंय.
तुम्ही माझ्यासारखा प्रामणिक माणूस गमावला; सुरेश धस असं का म्हणाले?, पंकजा मुंडेंवर का आरोप केले?
दरम्यान, सकाळी 8 : 30 वाजता समाजकल्याण विभाग आणि सीएसआरडी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे. अहिल्यानगर शहरातून भव्य रॅलीच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येणार असून रॅलीनंतर 9 : 30 वाजता सीएसआरडी महाविद्यालयात संविधानाचा जागर महोत्सव पार पडणार आहे.