संविधानाचा रंग बदलणारे संविधानाचे रक्षण करू शकत नाहीत, अमित गोरखेंचा शेवगावमधून कॉंग्रेसवर हल्लाबोल

  • Written By: Published:
संविधानाचा रंग बदलणारे संविधानाचे रक्षण करू शकत नाहीत, अमित गोरखेंचा शेवगावमधून कॉंग्रेसवर हल्लाबोल

शेवगाव : मागील सत्तर वर्षात काँग्रेसला (Congress) जे सुचलं नाही, ते भाजपने करुन दाखवले. माझ्यासारख्या मागास घटकातील सामान्य युवकाला विधान परिषदेवर संधी दिली. भारताच्या राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविद, द्रोपदी मुर्मु यांना संधी दिली. तर लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर ताब्यात घेतले. ३७० सारखे कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विदेशात जाऊन सर्व आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगतात, संविधानाचा निळा रंग बदलून लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. त्यांच्यापासून संविधानाला खरा धोका आहे, अशी टीका आमदार अमित गोरखेंनी (MLA Amit Gorkhe) केली.

जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल 

आमदार अमित गोरखेंनी बोधेगाव येथे सोमवारी (दि. 11 नोव्हेंबर) महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. या वेळी गुजरातचे आमदार महेश कासवाल, विवेक मिसाळ, चंद्रकांत काळोखे, दादाराव भोसले, बापूसाहेब भोसले, सुभाषराव बर्डे, बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, बाबा राजगुरु, अनिल वडागळे, भगवान साठे, मिनाताई कळकुंभे, सुरेश भागवत, रवी आरोळे, अस्मानराव घोरतळे, संतोष वाबळे, दिलीप विखे, शरद चाबुकस्वार, नवनाथ भवार, भाऊसाहेब पाटील, अशोक ससाणे, अशोक खिळे, संजय खेडकर, सचिन बारस्कर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कासमभाई शेख, भाजपचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन वारकड, संदीप देशमुख, विक्रम बारवकर, सुगंध खंडागळे, लहूराव भवर, अंबादास ढाकणे, महेश घोरतळे, सुनील राजपुत, सचिन भारस्कर, कुद्दुस पठान, राजेंद्र डमाले, विक्रम देशमुख, प्रा.भाऊसाहेब मुरकुटे, यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raanti Film : समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित… 

पुढे बोलताना गोरखे म्हणाले, मोदी सरकारच्या काळामध्ये ३७० सारखे कलम हटवून तिथे अनुसुचित जाती-जमातींना प्रतिनिधित्व दिलं. अण्णाभाऊ साठे यांचे भारतातच नाही तर रशियामध्ये जाऊन स्टॅचु उभारण्याचे काम महायुती सरकारने केलं. अण्णाभाऊ साठे आणि लुहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक व्हावे, अशी सर्व मातंग समाजाची मागणी होती. आज पुण्यामध्ये ५ एकर जमीन देवून त्याठिकाणी स्मारकाचे काम झाले. डॉ.बाबासाहेब अंबेडकरांचे लंडन मधील घर मिळविण्याचे आणि दिक्षा भुमी तसेच चैत्यभुमीला निधीची मोठी तरतूद करण्याचे काम भाजप-महायुतीच्या काळात झाले. अशा गोष्टी कॉंग्रेस सरकारला कधी सुचल्या देखील नाहीत, असं म्हणत देशात भाजपचे भक्कम सरकार आहे. राज्यात तेच सरकार निवडून द्या, म्हणजे विकासाची गंगा जनतेपर्यंत येईल, असं आवाहन गोरखेंनी केलं.

कॉंग्रेसकडून आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा
अण्णाभाऊ साठे रिसर्च (आर्टी) संस्थेच्या माध्यमातून हजारो मागासवर्गीय तरुण आज लाल दिव्यांच्या गाड्यामधून फिरतांना दिसत आहेत. रमाई योजनेच्या माध्यमातुन लाखो कुटुंबांना चांगली घरे देण्याचे काम झाले. भाजप सरकारने कुठलाही दुजाभाव केलेला नाही. या योजनेत राज्यात सर्वात जास्त १ लाख ३० हजार महिलांना शेवगाव पाथर्डी मतदार संघात आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे. तर उलट लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात जाणा-या काँग्रेस सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा सुरु केली. मग डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचा वारसाजपणाऱ्या समाजाने आतातरी कॉग्रेस सरकारला ओळखून महायुतीला साथ दिली पाहिजे, असं आवाहन गोरखे यांनी केलं.

जनतेची काळजी घेणाऱ्या आमदार राजळे हॅटट्रिक करणार आहेत. कारण, राजळेंनी सर्व घटकांना सोबत घेऊन, मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीमागे ठाम उभ्या असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे गोरखे म्हणाले.

बोधेगाव येथे असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या हस्ती आहेत. त्याठिकाण मी आणि आमदार मोनिका राजळे यांच्या सहकार्यातून मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. भव्य स्मारक उभारण्याचे काम आम्ही यापुढील काळात करणार आहेत, तरी सर्व अनुसुचित जाती-जमातीतील समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना जिवंत ठेवण्यासाठी महायुती सोबत राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, दहा वर्षात राजकीय, सामाजिक प्रवासात प्रत्येक गावाला काही ना काही दिले. सर्व जातीपातीचे लोक विकासाच्या प्रवाहात आले. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते, त्याच भावनेतून आजवर काम करत आहे. त्यामुळेच रस्ते, विज आणि पाण्याचे प्रश्न मार्गी लागलेत. यापुढील काळात उद्योग-धंद्यांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करावयाचा आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीला मतदान करावे, असे आवाहनही राजळेंनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम केसभट, तर सूत्रसंचलन सोमेश्वर शेळके यांनी केले. यावेळी आमदार गोरखे यांच्या उपस्थितीत परिसरातील अस्मानराव घोरतळे, संतोष वाबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube