Download App

दुर्देैवी! जळगावच्या जिल्हा रुग्णालयात मृतांचा खच; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा तज्ञांचा अंदाज

जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच पडलेला आहे. दरम्यान, यामधील 50 पैकी तब्बल सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जातय.

Jalgaon Government District Hospital :  जळगाव जिल्ह्यातून मोठी घटना समोर आली आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच पडलेला आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यामधील 50 पैकी तब्बल सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जातय. गेल्या आठ दिवसांत वेगवेगळ्या घटनांमधील हे मृतदेह आहेत. त्यातील अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नसून त्याकडे कुणी फिरकुनही पाहिलेलं नाही असं धक्कादायक वास्तव येथे समोर आलं आहे.

 

उन्हाच्या कटाविरूद्ध थेट 144 लागू; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

उष्मघाताचे बळी

येथे एकून 50 मृतदेह आहेत. त्यातील बहुतांश मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. यातील मृत व्यक्ती विविध आजारांनी मृत्यू पडलेले आहेत. तसंच काही मृत्यू हे उष्मघाताने झाले आहेत असंही तज्ञ डॉक्टरांचं मत आहे. तसंच, यामध्ये रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यानं या सर्व व्यक्तींचा उन्हाच्या तिव्रतेने मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

पाच वर्षातील सर्वात जास्त पारा

सध्या राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलाय. नुकताच उष्माघाताने छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, जळगावमध्ये वाढत्या तापमानामुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी लावण्यात आली आहे. त्याचबरोबर तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियसपर्यंत वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर यवतमाळमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 अंशाच्या पुढे गेला आहे. हा पारा गेल्या पाच वर्षातील सर्वात जास्त आहे.

follow us