भिक्षुक मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! “मयत भिक्षुक नव्हतेच”; नातेवाईकांचा दावा, प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात..

भिक्षुक मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! “मयत भिक्षुक नव्हतेच”; नातेवाईकांचा दावा, प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात..

Ahilyanagar News : शिर्डी येथून पोलीस कारवाईमध्ये काही भिक्षकुंना ताब्यात घेण्यात आले होते यापैकी १० भिक्षुकांपैकी चार भिक्षुक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईमधील भिक्षुक नव्हतेच असा थेट आरोप आता मयतांच्या नातेवाईकांकडून केला जातो आहे. प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईमुळे तसेच जिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे यांचा मृत्यू झाला आहे, असे गंभीर आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केले आहेत. यामुळे हे प्रकरण आता प्रशासनाच्या अंगलट येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिर्डी येथील भिक्षुकांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शिर्डीमधील वाढती गुन्हेगारी तसेच या भिक्षुकांकडून व्यसनाधीनता केली जात आहे. यामुळे शिर्डीत वाढती गुन्हेगारी व अनुचित प्रकारांना आळा बसावा यासाठी या भिक्षुकांना ताब्यात घेण्यात आले होते. शिर्डी येथून तब्बल पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या भिक्षुकांना श्रीगोंदा येथील विसापूर येथे पाठविण्यात आले होते.

धक्कादायक! शिर्डीतील चार भिक्षुकांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू; नातेवाईकांचे प्रशासनावर गंभीर आरोप

दरम्यान यामधील दहा जणांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चौघे हे पळून गेले तर चौघांचा मृत्यू झाला व दोघांवर उपचार सुरू आहेत. मयतांमधील दोघा जणांच्या नातेवाईकांची ओळख पटली आहे. मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात येत मयत हे भिक्षुक नव्हतेच ते काम करून आपली उपजीविका करत होते असे सांगितले. तसेच प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये आमच्या नातेवाईकांना विनाकारण ताब्यात घेण्यात आले. ते खरच भिक्षुक होते का याची शहानिशा त्यांनी केली नाही. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे प्रचंड हाल करण्यात आले.

रुग्णांना पाण्याविना ठेवण्यात आले तसेच त्यांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील कर्मचारी त्यांची देखभाल करत नव्हते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत आहे. तसेच प्रशासनाने केलेल्या चुकीच्या कारवाईमुळे आमच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मयतांचे नातेवाईक आरोप करत आहेत. या गोष्टीला जबाबदार असलेल्या प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आता मयतांच्या नातेवाईंकडून केली जात आहे. दरम्यान आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार तसेच याचे शिर्डी मध्ये काय पडसाद उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिनेते मनोज कुमार आणि शिर्डीचं नात अतूट होतं; मंत्री विखे पाटीलांनी जागवल्या आठवणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube