मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो! वडेट्टीवार आक्रमक; ‘सत्तापिसासू भाजप मृतदेहावरून रॅली काढतंय का?
Vijay Wadettiwar on PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नाशिकमध्ये सभा घेतली. त्यानंतर आता ते मुंबईत घाटकोपरमध्ये रोड शो करणार आहेत. यावरूचन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोदींवर टीका केली.
‘मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात’; CM शिंदेंचा घणाघात
सत्तापिपासू भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?
मुंबई मधील होर्डींग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे.
भ्रष्ट महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि धोरणांमुळे या दुर्घटनेत 18 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत.…— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 15, 2024
विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, मुंबईमधील होर्डिंग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे. भ्रष्ट महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळं आणि धोरणांमुळे या दुर्घटनेत 18 निष्पाप लोकांना जीव गमावावा लागला. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाही. सत्तापिसासून भापजचा संवेदनशीलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. मात्र रॅली काढून भाजपला आनंद मिळतांना दिसतोय, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
Shah Rukh Khan: ‘किंग’ मधील शाहरुख खानचा लूक लीक; सोशल मीडियावर सेटवरील Photo Viral
राहुल गांधी यांची मोदींनी भीती
आज मोदींचा रोड शो मुंबईत होतोय आणि राज्यात 24वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही एखादा नेता इतक्या सभा घेत नाही. तेवढ्या सभा मोदी या राज्यात घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, राहूल गांधी यांची मोदींनी भीती वाटते. महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार आहे. त्यामुळं भाजपची घाबरली आहे. पंतप्रधानांनी नाशिकमध्ये सभा घेतली, पण कांदा प्रश्नावर ब्र सुध्दा काढला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या राज्यात पिळवणूक केली जात आहे, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी 45 तासानंतरही ढिगारा उसण्याचे काम सुरू आहे. बुधवारी या ठिकाणी एक लाल रंगाची कार अडकल्याची दिसून आली. त्यात दोन जण अडकले असण्याची शक्यता आहे. लोखंडी ढिगाऱ्यामुळं ही कार पूर्णपणे चेपली आहे. त्यामुळं त्यातील प्रवासी जिवंत असण्याची फार कमी शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक दबलेत याची आकडेवारी प्रशासनाकडे किंवा अन्य कुणाकडेही नाही. त्यामुळे अजून 35 ते 40 लोक याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.