उन्हाच्या कटाविरूद्ध थेट 144 लागू; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
144 applicable in Jalgaon : उष्णतेचा पारा राज्यात चांगलाच वाढलाय. विदर्भासह खांदेशात तापमानाचा उच्चांक मोठा वाढलेला पाहायला मिळतोय. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याची माहिती समोल आलीय. माणसं उष्मघाताने मरतील अशी परिस्थिती आहे. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील गावात 100 पेक्षा जास्त शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
PMC : तापमान वाढणार! महानगरपालिकेकडून पुणेकरांसाठी उष्माघातासंबंधी सूचना जारी
आपत्ती व्यवस्थापन
जिल्ह्यातील कुठल्याही संस्थेने किंवा फर्मने आपल्या कामगारांना उन्हात काम करण्यास सांगू नये. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 144 कलमान्वये आदेश पारित करण्यात आले आहेत. मात्र, या 144 कलमाचा अर्थ जमावबंदी अथवा लॉकडाऊन अशा अर्थाने काहीजण लावत आहेत. मात्र, तो तसा लावण्यात येऊ नये, असंही जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात माहिती देताना प्रसाद म्हणाले की, सध्या जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. त्यामुळे, अशा काळात नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्याचाच हा भाग आहे.
Bhumi Pednekar: पक्ष्यांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी धान्य, पाणी ठेवण्याचे अभिनेत्रीचे आवाहन
जमाव बंदी नाह
तसंच यामध्ये मुलांचे, महिलांचे आणि कामगारांचे उन्हापासून संरक्षण व्हावं, त्यांना कोणीही उन्हात काम करण्यास सांगू नये आणि तसं कोणी करत असेल तर 144 या कलमान्वये संबधित व्यक्ती देखील त्या संस्थेविरोधात तक्रार करू शकते, असं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सुचनेत म्हटलं आहे. तसंच, अशा प्रकारची तक्रार कोणी केल्यास संबंधित सरकारी यंत्रणांकडे या संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार कलमान्वये आहेत. मात्र, याचा अर्थ कोणीही जमाव बंदी लावण्यात आली किंवा लॉकडाऊन करण्यात आले आहे, असा काढू नये असंही यामद्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.