पुणेकरांची उन्हाने लाहीलाही; तापमानाने गाठला उच्चांक

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T134450.876

Pune Temprature :  राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा लागत आहेत. पुण्यातील अनेकांना तर दुपारच्या वेळेला घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पुण्यामध्ये सरासरी तापमान 40.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

पुणे राज्यातील तापमानाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. पहिल्या क्रमांकावर हॉट सीटी असे ओळख असणारे चंद्रपूर हे शहर आहे. चंद्रपूरमध्ये 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यंदा एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा वाढला आहे.

‘मै सब का भाई नहीं हूं…’धमकी प्रकरणावर सलमान खानचे मोठं वक्तव्य

पुण्यामध्ये सकाळी थंडी आणि दुपारी उन यामुळे नागरिक हैरान झाले आहेत. दिवसभरामध्ये 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाचा फरक पडत आहे. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. गेल्या काही वर्षामध्ये पुण्यामध्ये सातत्याने उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे.

शिरुर येथे 40.2 अंश सेल्सिअस कोरेगाव पार्क 39.5 अंश सेल्सिअस, लवळे 39 अंश सेल्सिअस, वडगाव शेरी 39 अंश सेल्सिअस, चिंचवड 38 अंश सेल्सिअस, मगरपट्टा 37.9 अंश सेल्सिअस असा तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे.

तयारील लागा! लवकरचं बिगुल वाजणार; चंद्रकांत पाटलांचं पालिका निवडणुकांबाबत मोठं विधान

दरम्यान विदर्भातील चंद्रपूर, अकोला, वर्धा या तीन शहरांची सर्वाधिक तापमान असलेले शहर म्हणून नोंद होत असते. चंद्रपूरमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असते. यावेळी पुण्यामध्ये देखील तेवढे तापमान पहायला मिळते आहे.

 

Tags

follow us