जळगावात नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले; गुलाबरावांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने मोठा राडा

जळगावात नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले; गुलाबरावांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने मोठा राडा

Dispute In Paladhi Village of Jalgaon District : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या अन् कारचा कट लागल्याच्या कारणातून वाद उफाळला. (Jalgaon) ही घटना जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात काल ३१ डिसेंबरच्या रात्री घडली आहे. यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राडा घातला. यानंतर संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळ केली. या घटनेत १२ ते १५ दुकाने जाळली आहेत.

वाल्मिक कराडच्या कारवाईसंदर्भात सरकारवर दबाव; असं का म्हणाले डॉ. प्रकाश आंबेडकर?

या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून जाळपोळीला कारणीभूत असलेल्या तरुणांची धरपकड सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल ३१ डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी अन् कुटुंबियाला घेऊन एक कार चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे.

वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube