Ganeshotv 2023 : येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त श्रीगणेशाचे स्वागत व गुणगान करणाऱ्या, ‘गोड नैव्यद्याची झाली तयारी लगबग लगबग उत्साह भारी, माझ्या बाप्पाची आली हो स्वारी’ या नव्याकोऱ्या गाण्याचे लोकार्पण अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात उत्साहात झाले. नगरचा हरहुन्नरी गायक गिरिराज जाधव यांनी गायलेले या भक्तिगीताचे लोकार्पण मंदिराचे पुजारी संगमनाथजी महाराज यांच्या शुभहस्ते झाले.
नागपूरमध्ये दिवाळीपूर्वीच फुटणार फटाके; RSS च्या बालेकिल्ल्यात होणार ‘इंडिया’चे शक्तिप्रदर्शन
यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आदेश चंगेडिया, गाण्याच्या गीतकार सिद्धी ढोके, गौतम मुनोत, पवन गांधी, गायक पवन नाईक, सागर पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.
Teen Adkun Sitaram Trailer: प्राजक्ता माळीच्या ‘तीन अडकून सीताराम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, गिरीराज जाधव हा नगर मधील उभरता उत्तम गायक आहे. त्याने गायलेल्या श्रीगणेशाचे स्वागत करणाऱ्या नव्या गाण्याचे लोकार्पण आपल्या ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्या मंदिरात झाल्याने येत्या गणेशोत्सवात हे गाणे नक्कीच हिट होईल, अशी खात्री व्यक्ती केली.
आणखी दहा दिवस देतो, नंतर मात्र.. जरांगेंनी सांगितलं पुढं काय करणार?
आदेश चंगेडिया म्हणाले, नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती हे जागृत देवस्थान आहे. अशा जागृत स्थळी गिरीराजच्या गाण्याचे लीकार्पण झाल्याने हे गाणे नागरिकांच्या पसंतीस उतरेल. गणपती बाप्पाचे हजारो जाने अजरामर झाली आहेत. गिरीराजचे हे गाणेही असेच अजरामर व्हावे, अश्या शुभेच्छा दिल्या.
गाण्या विषयी माहिती देताना देताना गायक गिरीराज जाधव म्हणाले, २२ ऑगस्टला गीतकार सिद्धी ढोके यांनी मला या गाण्याचे बोल पाठवले. हे बोल वाचता वाचताच गाण्याची चाल जन्माला आली. संगीतकार सत्यजित केळकर यांनीही लगेचच सुंदर संगीताने या गाण्यास सजवले त्यामुळे ३० ऑगस्टला हे गाणे तयार ही झाले. आता हे गाणे इंस्टाग्राम, फेसबुक म्युझिक सह सर्व ऑडीओ प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी या गाण्यास प्रतिसाद द्यावा.
गीतकार सिद्धी ढोके म्हणाल्या, बाप्पावरची भक्ती सहज व सोप्या शब्दातून मी या गीतामधून मांडली आहे. ओठांवर बसणारी अनुरूप चाल गिरीराजने लावत सुंदर आवाजात हे गाणे गायले आहे. केवळ १५ दिवस एवढ्या कमी कालावधीत हे गाणे तयार झाले आहे.