Teen Adkun Sitaram Trailer: प्राजक्ता माळीच्या ‘तीन अडकून सीताराम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Prajakta Mali New Movie:मराठी मनोरंजनसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) आगामी ‘तीन अडकून सीताराम’ (Teen Adkun Sitaram Movie) या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे. अशामध्ये या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर बघून चाहत्यांना सिनेमा कधी प्रदर्शित (Teen Adkun Sitaram Trailer Released) होणार याची मोठी उत्सुकता लागली आहे. ‘दुनिया गेली तेल लावत’, अशी टॅगलाईन असणारा हा सिनेमा २९ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमामध्ये प्राजक्ता माळीबरोबर अभिनेता वैभव तत्ववादी, हृषिकेश जोशी, आलोक राजवाडे आणि संकर्षण कर्हाडेनं हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. ‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट बुधवारी (काल) पार पडला. या ट्रेलरमध्ये असे दिसून येत आहे की, वैभव, आलोक आणि संकर्षण हे तीन मित्र लंडनमध्ये गेलेले असतात. लंडनमधील पबमध्ये दारुच्या नशेत तिघेही जोरदार धिंगाणा घालतात. दारुच्या नशेमध्ये तिघेही काहीतरी अशी गोष्ट करतात की, ज्यामुळे पोलीस त्यांना अटक केल्याचे बघायला मिळाले आहे. आपण नशेत काय केलं याची त्यांना किंचितही जाणीव नसते.
प्राजक्ता माळी ही या सिनेमामध्ये वैभवची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्याचे कळताच प्राजक्ता तिघांना सोडवण्यासाठी चांगलीच धडपड करत असते. जेलमध्ये अडकलेल्या या तिघांचे नेमकं काय होणार? प्राजक्ताला त्यांना जेलमधून बाहेर काढण्यामध्ये यश येईल की नाही? या सर्व गोष्टी तुम्हाला सिनेमामध्येच बघायला मिळणार आहे.
Manushi Chhillar: अभिनेत्री मानुषी छिल्लरने पटकावला ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ अवॉर्ड
‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमामध्ये वैभव तत्ववादीने पुष्कराजची मुख्य भूमिका साकारली आहे. तर संकर्षणने अजिंक्यची भूमिका साकारली आहे. तसेच अलोकने कौटिल्यची भूमिका साकारली आहे. याबरोबरच या सिनेमामध्ये प्राजक्ता माळीसोबत गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचे डायलॉग हृषिकेश जोशी यांनी लिहिले आहे. हा सिनेमा २९ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.