माझी राज्यसभा लोखंडेंना द्या, शिर्डीतून मी लढतो, आठवलेंनी दिला महायुतीला फॉर्म्युला

Ramdas Athawale on Sadashiv Lokhande : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. महायुतीसमोर नवीन प्रस्ताव दिला आहे. खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) माझे चांगले मित्र आहेत. त्यांना माझे राज्यसभेचे उरलेले दोन वर्ष द्या आणि मला शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात संधी द्यावी, असा फॉर्मुला त्यांनी महायुतीला […]

Ramdas Athawale

Ramdas Athawale

Ramdas Athawale on Sadashiv Lokhande : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. महायुतीसमोर नवीन प्रस्ताव दिला आहे. खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) माझे चांगले मित्र आहेत. त्यांना माझे राज्यसभेचे उरलेले दोन वर्ष द्या आणि मला शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात संधी द्यावी, असा फॉर्मुला त्यांनी महायुतीला दिला आहे.

2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी राखीव झाला होता. त्यावेळी मी या ठिकाणी उमेदवार होतो. पण त्यावेळी माझा पराभव झाला होता. परंतु त्या पराभवामुळे माझी शिर्डीवर नाराजी नाही. मी लोकसभा लढवावी अशी देशातील नागरिकांची इच्छा आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

बारामतीत कोणी दहशतीचे राजकारण करत असेल तर मला सांगा, युगेंद्र पवारांनी दंड थोपटले

जनतेशी संवाद साधण्यासाठी रामदास आठवले नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिर्डी येथे अनेक विषयांवर भाष्य केलं. ते पुढं म्हणाले की भाजप कोणाचीही पक्ष संपवत नाही. तस त्यांनी प्रयत्न केला तरी पक्ष संपत नसतो. आमच्या पक्षाचे लोक निवडून आले नाहीत तरी देखील आमचा पक्ष संपला नाही. महायुतीच्या नेत्यांनी जागा वाटपावरुन ओढाताण करण्याची गरज नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.

‘संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन केलं होतं का? फडणवीसांचा थेट सवाल

शिर्डीमधून संधी मिळाली तर मतदारसंघाचा चांगला विकास होईल. 2024 मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत आणि मंत्री होणारच आहे. माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्याची मला संधी उपलब्ध होईल. शिर्डी संस्थानाला बळकट करण्यासाठी मी काम करेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

Exit mobile version