बारामतीत कोणी दहशतीचे राजकारण करत असेल तर मला सांगा, युगेंद्र पवारांनी दंड थोपटले

बारामतीत कोणी दहशतीचे राजकारण करत असेल तर मला सांगा, युगेंद्र पवारांनी दंड थोपटले

Yugendra Pawar On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात सख्या यांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दंड थोपटले आहेत. बारामतीत दहशतीचे राजकारण होत असेल, तर मला सांगा, मग मी बघतो, असा इशारा दिला आहे. युगेंद्र पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी गावोगावी दौरे सुरू केले आहेत. आज उंडवडीत येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची चर्चा सध्या बारामतीत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटाला आव्हान दिले आहे. बारामतीत दहशतीचे राजकारण सुरु आहे. असे राजकारण बारामतीकरांनी पाहिलेले नाही. कोणी फोन करून धमकावल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढाई सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे. आता सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत.

छत्रपती संभाजीनगर से मजलिस को भगाना है; भाषणाच्या सुरुवातीलाच शाहांनी डिवचलं

राष्ट्रवादीतील बंडानंतर युगेंद्र पवार यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट दंड थोपटले आहेत. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यासोबत त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत.

‘आमच्यात फाटलंय’ पण ताईंचं वेगळंच उत्तर; ‘पक्ष अन् कुटुंबात फुट नाहीच’…

लोकसभेनंतर बारामती विधानसभा मतदारसंघात देखील पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो. युगेंद्र पवार यांच्याकडे महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले आहे आहे. त्यामुळे भविष्यात अजित पवार यांच्याविरोधात ते निवडणूक लढू शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube