Download App

आमच्या आरक्षणावर डोळा ठेवला तर तुमची आमदारकी, खासदारकी घेऊ; पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar on Rohit Pawar : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) म्हणजे खीर आहे का? कोणाला चॅलेंज देत आहात, आमच्या सरपंच, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष या पदांवर डोळा ठेवला आहे. तुम्ही आमचे सरपंच घ्या, आम्ही आमदार, खासदारकी घेऊ, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली.

अहमदनगर येथील क्लारा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आज (03) दुपारी 3 वाजता ओबीसींचा महालगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली. हा लढा भुजबळ आणि पडळकरांचा नसून ओबीसींवर हल्ला करणाऱ्यांविरोधात आहे, असे ते म्हणाले.

ओबीसी महा एल्गार मेळाव्याला विजय वडेट्टीवारांसह राम शिंदेंची दांडी

अहिल्याबाई होळकरांनी म्हटले आहे की, राजा का बेटा राजा नही बनेगा. या जिल्ह्यात रोहित पवार नावाचा जातीयवादी नेता आहे. तुम्ही हे पार्सल बारामतीला पाठवणार का नाही? जातीवादाला चेहरा असता तर रोहित पवार सारखा दिसला असता, अशी टीका पडळकरांनी रोहित पवारांवर केली.

Chhagan Bhujbal : अंबड रॅलीच्या आदल्या दिवशीच राजीनामा दिला होता; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

एक नवीन शब्द अस्तित्वात आला – सगेसोयरे, पैसे देऊन बनावट प्रमाणपत्रे मिळत आहेत. तुम्ही ओबीसी आरक्षणाला हात लावला नाहीतर जेसीबीने संविधानाचा पायाच नष्ट केला आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात असताना सगेसोयरे हे नवीन आहेत. अधिसूचना काढून सरकारने चूक केलीय. मागास नसलेला मराठा समाज मागासलेल्या कुणबी समाजाशी सजातीय कसा असू शकतो? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच देणार नाही, ओबीसींचाच मुख्यमंत्री करू; शेंडगेंचा इशारा

follow us