जेवढी लाईट वापरली तेवढं बिल आपल्याला आलं पाहिजे, त्यानुसार प्रत्येकजण महावितरणचं आलेलं बिल भरत असतो. अनेकदा तर अव्वाच्या सव्वा बिल आलेले अनेक प्रकार उघडकीस आलेले आपण पाहिलेत. पण एका छोट्या व्यवसायिकाला एक महिन्याचं तब्बल लाखोंच्या आसपास बिल आल्याचा प्रकार घडला. महावितरणकडून बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्यास तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. हे बिल पाहुन बांगडी व्यवसायिकाला धक्काच बसला आहे.
औरंगजेब ईडीच्या रुपात आजही जिवंत, ईडीच्या कारवाईवर अमोल मिटकरींनी खदखद बोलून दाखवली…
प्रत्येकाच्या घरी, दुकानात, शेतात, व्यवसायामध्ये विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. विजेसाठी ग्राहक महिन्याला बिलाच्या स्वरुपात महावितरणला बिल अदा करीत असतात. मात्र, मागील काही वर्षांत अव्वाचं सव्वा बिल पाठवणं, चुकीचं बील आकारणे, मनमानी पद्धतीने वीजबिल वसुल करणे, अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.
New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स
याचाच फटका नाशिकमधील मनमाड इथल्या बांगडी व्यवसायिकाला बसला आहे. या बांगडी व्यवसायिकाच्या घरात तीन लाईट आणि एक पंखा आहे असे असताना देखील त्यांना वीज महावितरणने त्यांना एक महिन्याचे तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवले आहे.
CM शिंदे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर; जागा वाटप अन् मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हाणार?
मनमाड शहरातील सरदार पटेल रोडवर राहणारे इक्बाल शेख यांची शिवाजी चौकात बांगड्या विकण्याची छोटीशी टपरी असून त्यावर कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालतो. घरात तीन लाईट आणि एक पंखा आहे. असे असताना देखील महावितरणने त्यांना एक महिन्याचे तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवले आहे. एवढं बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
राहुल नार्वेकर करणार तरी काय? झिरवळांनी दिलं खोचक उत्तर
त्यांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन दर महिन्याला बील भरलेले असताना, माझी कोणतीही थकबाकी नसताना मला लाखो रुपयांचे बील का देण्यात आले अशी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी चार लाखातून बिल कमी करुन त्यांना 2 लाख 13 हजार 360 रुपयाचे बिल देऊन तातडीने भरण्यास सांगितले.
दरम्यान, याबाबत वीज महावितरण कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. अखेर राज्यात अव्वाचं सव्वा वीजबिल येणं हे नागरिकांना काही नवीन नाही. अशा घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. या प्रकारानंतर महावितरणकडून असे प्रकार कधी थांबतील? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.