औरंगजेब ईडीच्या रुपात आजही जिवंत, ईडीच्या कारवाईवर अमोल मिटकरींनी खदखद बोलून दाखवली…
ईडीच्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीकेची तोफ डागली आहे. वाळव्यातील बागणी येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवरुन खदखद व्यक्त केली आहे. वाळवा ग्रामपंचायतीच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अमोल मिटकरी बोलत होते.
कपाळावर टीळा, गळ्यात माळ; केदारनाथनंतर आता अक्षय कुमार बद्रीनाथच्या दर्शनाला, व्हिडिओ व्हायरल
ते म्हणाले, औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपात तो आजही जिवंत असल्याचं म्हणत मिटकरी यांनी टीका केली आहे. तसेच औरंगजेबाची कितीही आक्रमणे आली तरी कधीही छ. संभाजी महाराज डगमगले नाहीत. पोर्तुगीजांची, डचांची, इंग्रजांची, मोघलांची आक्रमणे झाली, पण संभाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. हेच रक्त आज तुमच्या-आमच्यामध्ये असल्याचं ते म्हणाले आहेत.
New Parliament Building Inauguration : ‘सेंगोल’समोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत…
तसेच औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने तो आजही जिवंत आहे. त्यामुळे ईडीची कितीही आक्रमणे झाली तरी त्याला किंचितही शरण न जाणारा योद्धा म्हणून खासदार शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांच्याकडे आम्ही पाहतो. जे शरण गेलेत ते आता काही दिवसांनी शपथ घेतील. पण जे शरण गेले नाहीत त्यांना काही दिवस त्रास होत राहतो, मिटकरी म्हणाले आहेत.
जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून त्यांना आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. पहिल्यांदा नोटीस पाठवण्यात आल्यानंतर कौटुंबिक कारणास्तव त्यांनी चौकशीसाठी वेळ मागवून घेतला. मात्र नुकतेच ईडीने त्यांना नुकतेच दुसरे समन्स पाठविले. त्यानंतर जयंत पाटील 22 तारखेला ईडीसमोर हजर झाले. ईडीने जयंत पाटील यांची तब्बल नऊ तास चौकशी केली.
दरम्यान, आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असतील त्यामुळेच त्रास देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शरद पवारांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवर रोख ठेवण्यात आला.