Ahmednagar : अनेक वर्षांपासून श्री राम जन्मभूमी आयोध्या (Ayodhya)येथे नियोजित असणारे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare)यांना देण्यात आले आहे.
सोनं चोरलं, मातीत पुरलं अन् डिटेक्टरनं शोधलं; पुणे पोलिसांनी असा लावला चोरीचा शोध…
पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी या सोहळ्यासाठी जाण्याबाबत सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे या मंगलकारी सोहळ्याचे हजारे साक्षीदार होणार आहेत. नाशिक विभागातून सामाजिक कामे करणाऱ्या 10 नामवंतांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे . त्यात हजारे यांच्यासह पद्मश्री पोपटराव पवार यांचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामाच्या भक्तीत तल्लीन, टाळ वाजवला, भजन केलं; पाहा फोटो
यावेळी अहमदनगरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. रवींद्र साताळकर व नाशिक विभागाचे संपर्कप्रमुख घनश्याम दोडिया, नगर दक्षिणचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कैलास गाडीलकर, दत्ता आवारी, श्याम पठाडे, शिल्पा गाडीलकर आदी उपस्थित होते.
श्री राम मंदिर न्यास ट्रस्टतर्फे श्री रामप्रभू यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण डॉ. साताळकर व दोडिया यांच्या हस्ते अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धी येथे देण्यात आले.
यावेळी अण्णा हजारे यांनी निमंत्रण मिळाल्याबद्दल न्यासाचे आभारही मानले. प्रवास खूप लांबचा आहे. प्रकृती व्यवस्थित असेल, तर मी सोहळ्यासाठी जाईल, असेही अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितले .