Download App

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय खोलात? BHR बॅंक घोटाळ्याप्रकरणी CBI कडून गुन्हा!

Bhagyashree navtake : भाईचंद हिराचंद रायसोनी बॅंक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

IPS Bhagyashree Navtake News : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) राज्य सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके (Bhagyashree Navtake) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आलीयं. राज्य सरकारकडून ऑगस्ट 2024 मध्ये या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडे तपासाची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता सीबीआयकडून नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात; कार अन् ट्रॅव्हलची धडक

भाग्यश्री नवटाके पुण्यामध्ये डीसीप आणि ईओडब्लू या पदावर कार्यरत होत्या. भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या 1200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं. हा घोटाळा 2020-21 साली झाला होता. या घोटाळ्याची राज्यभरात चर्चा झाली होती. अखेर भाग्यश्री नवटाके चांगलेच अडचणीत सापडले असून सीबीआयकडून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलायं.

मोठी बातमी : ठरलं! महादेव जानकर एकटेच भंडारा उधळणार; रासपची महायुतीला सोडचिठ्ठी

नवटाके यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलायं. त्यांनी बॅंकेच्या कथित 1200 रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचं नेतृत्व केलं होतं. नवटाके यांनी हवी तशी कारवाई केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलायं. तसेच आरोपींना वाचवण्याचाही प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलायं.

दरम्यान, नवटाके यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपायुक्त नवटाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

follow us