गृहविभागाचा आदेश, रायसोनी प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल

गृहविभागाचा आदेश, रायसोनी प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल

IPS Bhagyashree Navtake : गृहविभागाच्या आदेशावरून पुणे पोलिसांनी IPS भाग्यश्री नवटक्के (IPS Bhagyashree Navtake) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बातमीमुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बीएचआर प्रकरणाची चौकशी प्रकरणात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव मधील भाईचंद हिरांचद रायसोनी क्रेडिट सोसायटीतील घोटाळा प्रकरणात 2021 मध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त म्हणून नवटक्के कार्यरत होत्या. अंत्यत गुप्तता पाळत IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

Asian Champions Trophy भारतीय हॉकी संघाची घोषणा, चीनमध्ये ‘हे’ 18 खेळाडू करणार कमाल!

बीएचआर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा ठपका IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र त्यांच्यावर कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

येथे पाहा दाखल FIR कॉपी – Bhagyashri Navtake

वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चावर बनवला, टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube