BHR पतसंस्था गैरव्यवहार! अनेक पोलीस अधिकारी अडकणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

BHR पतसंस्था गैरव्यवहार! अनेक पोलीस अधिकारी अडकणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnvis Speak On BHR Bank : राज्यभरात चर्चेत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मास्टमाईंडसह दोषी आरोपींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) दिला आहे. तसेच पुढील महिनाभरातच या प्रकरणाची कारवाई होणार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच तत्कालीन सरकारने मंत्री गिरीश महाजनांवरही मोक्का लावण्याचा प्रयत्न केला होता, पण लावता आला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांवरही महिनाभरात कारवाई करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यभर गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरण विधानसभेतही गाजलं आहे. दरम्यान, भाजप आमदारांसह विरोधकांनी पतसंस्थेच्या गैरव्यवहाप्रकरणी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईबाबत सत्यता सांगितली आहे. या मुद्द्यावरुन खरा मास्टमाईंड कोण? त्यांच्यावर कडक केली जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

दूध उत्पादकांना दिलासा! सरकारकडून मिळणार प्रति लिटर 5 रुपये अनुदान, मंत्री विखेंची घोषणा

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या पुणे शाखेर गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या अर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई 17 जून 2021 रोजी करण्यात आली होती. या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवत ही कारवाई पूर्वनियोजित असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला आहे. या मुद्द्याला देवेंद्र फडणवीसांनीही समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ; अधिवेशनात सत्यजित तांबेंचे आरटीओंवर ताशेरे…

नेमकं प्रकरण काय?
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या प्रकरणात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आली आहे. सगळेच माझे निकटवर्तीय आहेत. आमदार चंदू पटेल यांचे नावही त्यात आहे. या सर्वांनी कर्ज फेड केली असल्याचा दावा कारवाईनंतर गिरीश महाजनांनी केला होता.

आता विधानसभेत या प्रकरणी सत्तारुढ पक्षाकडून आवाज उठवण्यात आलायं. भाजपचे आमदार यांनी सवाल प्रतिसवाल करीत या प्रकरणाच्या कारवाईबाबत आक्रमक पद्धतीने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर फडणवीस म्हणाले, हे प्रकरण महाराष्ट्रात घडलंय की बिहारमध्ये असा सवाल होतोयं. सीआयडीच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या. छाप्यासाठी तीन दिवस आधी हॉटेल बुक केलं. बुकिंग खाजगी माणसाने केले.

25 पोलिस चालले आहेत पण कुठं चालले हे सांगितलं नाही. एकाच दिवशी दीड तासांच्या अंतरात पुणे पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशी तिन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण तक्रारदार तिथं उपस्थितही नव्हता. त्याने सांगितलं की मला पैसे मिळाले त्यामुळे गुन्हा दाखल करण्याच कारण नाही. जाणीवपूर्वक फॉरेन्सिक ऑडिट करुन टार्गेट करायचं होतं ज्याची पात्रता नव्हती त्याला हे काम दिलं गेलं. खालून वरपर्यंत सगळ्या सह्या एकाच दिवशी झालेल्या असल्याने राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई झाली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

रिपोर्ट आमच्याकडे आहे काही अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आहे. या प्रकरणी एक महिन्याच्या आत कारवाई होईल. बॅंकेचे संचालक आठ वर्ष जेलमध्ये आहेत. या बॅंकेवर केंद्राच्या परवानगीने अवसायक बसवला. अवसायनामध्ये ठेवीदारांना ते सेटल करता येतात तशी परवानगी केंद्राची असते. सेटल झालेल्या एका महिलेची तक्रार आहे की मला पैसे मिळाले नाहीत. 20 लोकांनी कारवाई नाही पण 21 वा शोधून काढला आता ती महिला म्हणते ती माझी सही नाही. ती महिला एकाच वेळी तीन पोलिस ठाण्यात कशी काय हजर राहू शकते?असा सवालही फडणवीसांनी केला आहे.

राजकीय नेत्यांच्या दबावाखाली कारवाई :
काही लोकांच्या दबावाखाली तत्कालीन सरकारच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला गोवता येईल का? या हेतूने कारवाई झाली आहे. मोक्का लावण्याचाही प्रयत्न झाला होता, पण लावता आला नाही. राज्यात असं काम कधीच करत नव्हते असं काम आमच्यासाठी पोलिसांनी सुरु केलं तर महाराष्ट्रस, महाराष्ट्र राहणार नाही. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल. कोणाचा रोल किती आहे याचा आमच्याकडे अहवाल निलंबनाचीही कारवाई करणार असल्याच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube