Download App

प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

विशेष प्रतिनिधी (शिर्डी)
Jitendra Awhad On Sunil Tatkare: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाची धुसपुस 2014 पासूनच सुरू होती. यामागे प्रफुल्ल पटेल (Jitendra Awhad) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच मुख्य सूत्रधार होते, असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी 2014 पासून पक्षात घडलेल्या घडामोडीचा पाढाच वाचला.

आव्हाड म्हणाले, भाजप सोबत जावे अशी रट प्रफुल्ल पटेल यांनी 2014 पासून लावून धरली होती. तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेत्यांनी पुढे रेटून धरली होती. पण शरद पवार यांनी ही मागणी कधीच
मान्य केली नाही.

पण सुनील तटकरे यांनी आजित पवार यांना पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. तटकरे यांनी अजित पवार यांना वेगळ्या मार्गावर नेऊन पवारांच घर फोडलं, असा थेट आरोप आव्हाड यांनी केला.

तटकरे यांना शरद पवार यांनी भरभरून दिलं. स्वतः सुनील तटकरे मंत्री, मुलगा आमदार, पुतण्या आमदार, भाऊ आमदार, मुलगी आमदार मंत्री असे सर्व पद दिली. एवढचं काय मी मंत्री असतना अजित पवार यांनी मला पालकमंत्री करण्यापेक्षा अदिती तटकरे यांना प्राधान्य दिलं. एवढ असून सुनील तटकरे यांनी शरद पवार यांचे घर फोडले, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘महानंद’ला वाचवायचं सोडून ‘अमूल’ला मोकळे रान, किसान सभेची राज्य सरकारवर टीका

तटकरेंच्या घरात पण वाद सुरु आहेत. भावा भावाचे जमत नाही. बहीण भावाचे खरे नाही. तटकरे यांनी जे पेरले तेच उगवणार आहे. हे तटकरे यांना कळेल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून तटकरे आणि जितेंद्र आव्हाड असा संघर्ष सुरु आहे. त्यात आज आणखी एका आरोपाची भर पडली आहे.

लेट्सअप विश्लेषण : तिसरी बार मोदी सरकार! भाजपचा न डगमगता 400 जागांचा दावा कुणाच्या जोरावर…

2019 चं बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही पक्षाची सगळ्यात मोठी चूक झाली. जिथे जिथे संधी मिळाली तिथे साहेबांच्या माणसांचा त्यांनी अपमान केला आहे. दत्ता मेघे हे त्यापैकी एक उदाहरण आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा. ते तुमच्यावर बोलले तर एका मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही ते म्हणाले.

follow us