Ahmednagar News : कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. आहे. या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली आहे. (Jain Religious Leader Murder Silent March in Ahmednagar City )
‘त्याच्याकडून मी खूप काही शिकलो’; कोहलीच्या 500व्या मॅचपूर्वी द्रविडचे गौरवोद्गार
कर्नाटक मधील नंदी पर्वत क्षेत्रावर जैन समाजाचे धर्मगुरू परमपूज्य आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज हे आश्रम व एक सुंदर असे मंदिर निर्माण करून त्या ठिकाणी राहत होते. मात्र दोघा समाज कंटकांनी त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ देशभर जैन बांधव मूकमोर्चा, उपोषण, बंद या मार्गांनी आंदोलन सुरू आहेत.
धर्मगुरूंची हत्या! नगरच्या ‘या’ आमदारांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट…
या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी बोलताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, जैन धर्मगुरूंच्या हत्येच्या निषेधार्थ आज नगरमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी ठोस पाऊले उचलण्यात यावे या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
जैन साधू आचार्य यांची जी निर्घृण हत्या करण्यात आली अशा नराधमांना कोणती जात, धर्म नसतो. असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांसाठी उत्तरप्रदेशमध्ये अत्यंत कठोर कायदे करण्यात आले आहे. असे कायदे या नराधमांसाठी आपल्याइकडे देखील वापरण्यात यावे अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली आहे.
तसेच या हत्याकांडाच्या अनुषंगाने डॉ. अभय मुथा म्हणाले, या घटनेचा निषेध करण्यासाठी जैनसमाजासह सर्वपक्षीय नेत्यांनी या मूकमोर्चामध्ये सहभाग घेतला. अल्पसंख्याक असलेल्या या समाजाला संरक्षण मिळावे, अशा घटना भविष्यात घडू नये तसेच आम्हाला या मोर्च्याच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी अपेक्षा आम्ही करतो आहे.