धर्मगुरूंची हत्या! नगरच्या ‘या’ आमदारांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट…
MLA Sangram Jagtap : कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. आहे. या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्यावतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले. तसेच त्यांच्यासोबत कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे व आमदार सुनील टिंगरे हे देखील उपस्थित होते.
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली
कर्नाटकमधील नंदी पर्वत क्षेत्रावर जैन समाजाचे धर्मगुरू परमपूज्य आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज हे आश्रम व एक सुंदर असे मंदिर निर्माण करून त्या ठिकाणी राहत होते. मात्र, समाज कंटकांनी त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ देशभर जैन बांधव मूकमोर्चा, उपोषण, बंद या मार्गांनी आंदोलन सुरू आहेत.
कृषी कर्जांचे वाटप झालेच नाही, सरकार फक्त जखमेवर मीठ चोळते; पटोलेंची घणाघाती टीका
नुकतेच मुंबईमध्ये अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनासाठी नगर जिल्ह्यातील आमदार देखील मुंबईला गेले आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर आमदारांकडून सभागृहाचे लक्ष वेधण्याचे काम सुरु आहे. यातच कर्नाटकमध्ये झालेल्या जैन धर्मगुरूंच्या हत्येच्या निषेधार्थ नगरच्या काही आमदारांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
पवारांकडून अजित गव्हाणे यांची हकालपट्टी पण अजितदादांनी 24 तासात घेतला ‘हा’ निर्णय
यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आरोपींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हंटले की, सदर घडलेली ही घटना अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. तसेच जैनसाधु संपप्रती जैन धर्मियांच्या अस्मिता संवेदनशील भावना असतात आणि वारंवार घडणाऱ्या अशा घटना जैन समाजासाठी आणि सर्व मानवजातीला फारच वेदनादायी आणि मनाला हेलावून टाकणाऱ्या असतात.
सदर हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर न्याय मिळवा, अशी अपेक्षा आहे. तसेच अशा घटना या भविष्यात घडू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्यात यावी. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने देखील या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.