Download App

…तर मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल; आमदार आशुतोष काळेंचा प्रशासनाला कडक इशारा

MLA Ashutosh Kale: महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपलाय.

  • Written By: Last Updated:

Kopergaon MLA Ashutosh Kale On illegal sand mining: गोदावरी नदीतून (Godavari River) मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत आहे. वाळूतस्करांकडून नागरिकांना त्रास होत आहे. रस्ते खराब झाले आहेत. शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यावरून आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) हे आक्रमक झाले आहेत. नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. याबाबत अनेकवेळा महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. परंतु त्यांच्याकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपला आहे. वेळप्रसंगी कायदा हातात घेवून मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी दिला आहे.

लग्जरी कार्स, बॉडीगार्ड्सचा ताफा अन् राजकीय नेत्यांशी कनेक्शन; श्रीमंतांना लुटणारी ऐश्वर्या ईडीच्या ताब्यात

कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू उपशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आ. आशुतोष काळे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शासकीय वाळू लिलावातून शासनाला महसूल मिळतो हे मान्य आहे. परंतु हा वाळू उपसा करीत असतांना त्यासाठी महसूल व पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिलेले आहेत. मात्र हे नियम धाब्यावर बसवून प्रचंड वाळू उपसा केला जात आहे. शासकीय वाळू लिलावाबरोबरच अवैध वाळू व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची तर वाट लागलीच आहे. परंतु स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या सहकार्यातून व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहीलेल्या ज्या धारणगाव-कुंभारी पुलाने कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यास मदत केली. त्या पुलाच्या पायाजवळून दिवसा ढवळ्या सुरु असलेला वाळू उपसा महसूल आणि पोलीस प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ही चीड आणणारी बाब आहे. जर या पुलाच्या पायाजवळ सुरु असलेल्या वाळू उपश्यामुळे पुलाला काही धोका झाला तर काय परिणाम होवू शकतात याचे किंचितही गांभीर्य महसूल आणि पोलीस प्रशासनाला नाही. त्याबाबत अनेकवेळा महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. परंतु त्यांच्याकडून हा वाळू उपसा थांबविला गेला नाही. त्यामुळे मी स्वत: याबाबत पुढाकार घेत असल्याचे सांगत मला कायदा हातात घ्यावा लागेल असे संकेत देत मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल असा गर्भित इशारा त्यांनी दिलाय.


मोठी बातमी! राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी होणार

प्रशासनाची वाळूतस्करांना मदत ?
कोपरगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा असल्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोपरगाव तालुक्यासह बाहेरील तालुक्यातून वाळूतस्करांनी कोपरगाव तालुक्यात आपले बस्तान बसविले आहे. या वाळूतस्करांची मुजोरी एवढी वाढली आहे की, प्रशासनाचा वरदहस्त पाठीशी असल्यामुळे हे वाळूतस्कर कुणालाही जुमानत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक देखील या वाळू तस्करांच्या दहशतीखाली असल्यामुळे गोदावरी नदीतील कित्येक शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे नुकसान होवून देखील शेतकरी हा त्रास मुकाट्याने सहन करीत आहेत. परंतु या अवैध वाळूतस्करी विरोधात आ. आशुतोष काळे यांनीच आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी त्यांच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे.

follow us