लग्जरी कार्स, बॉडीगार्ड्सचा ताफा अन् राजकीय नेत्यांशी कनेक्शन; श्रीमंतांना लुटणारी ऐश्वर्या ईडीच्या ताब्यात

Aishwarya gauda in ED custody who robbed the rich and connections with political leader in Karnataka Congress
: सक्त वसुली संचलनालयाने बेंगलुरूमध्ये ऐश्वर्या गौडा नावाच्या एका 33 वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. तिने कर्नाटकमध्ये श्रीमंच लोकांना लुटलं आहे. तसेच तिने तिचे नेत्यांशी संबंध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ईडीने कॉंग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्या परिसरात देखील छापेमारी केली आहे.
मोठी बातमी : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; वृत्तवाहिन्यांना सरकारकडून सूचना
ऐश्वर्याला मनी लॉंन्ड्रिंग केसमध्ये अटक करण्यात आली आहे. तिच्यावर लोकांना गुंतवणुकीवर जास्त परताव्याचं आमिष दाखवलं आहे. त्यातून तिने 20 कोटी रूपायांची फसवणूक केली आहे. गेल्या एका वर्षांत तिच्यावर चार फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तिला कोर्टात देखील दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर कोर्टाने तिला ईडी कोठडी सुनावली आहे. या महिलेने कॉंग्रेस नेते डीके सुरेश आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे आपले भाऊ असल्याचं सांगितलं आहे.
राज्यात 5 हजारांहून अधिक पाकिस्तानी, नागपूरमध्ये सर्वाधिक; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी
दुसरीकडे कॉंग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्याशी देखील तिचे संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांच्यासोबत तिचे फोटो आहेत. त्यांना तिने कार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या घरावर देखील ईडीने छापेमारी केली आहे. मात्र कुलकर्णी यांनी हे आरोप फोटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, ईडीकडून त्यांच्यावर वेगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करत आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांना त्रास दिला जात आहे. माझं राजकीय करिअर संपवण्याचा यामागे हेतू आहे. असं ते म्हणाले आहेत.