मोठी बातमी : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; वृत्तवाहिन्यांना सरकारकडून सूचना

Government issues advisory to news channels not to provide real-time coverage of operations after Pahalgam attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा (Pahalgam Terror Attack) अतिरेक्यांनी बळी घेतला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. हिंदू असल्याची खात्री करून घेत त्यांना गोळ्या घातल्या. मानवतेला काळिमा फासणारं कृत्य अतिरेक्यांनी केलं. त्यानंतर माध्यमांमध्ये क्षणा क्षणाचे अपडेट करण्यात येत आहेत. मात्र यावर आता केंद्र सरकारने वृत्त वाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
अमृताने जपानमधल्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटला दिली भेट; पाहा खास फोटो
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्व वृत्तवाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून करण्यात येणाऱ्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे सांगण्यात आले आहे. कारण यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असं ते म्हटले आहेत. हे आदेश पहलगामध्ये झालेला हल्ला आणि त्यानंतर देशभरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
Ministry of Information and Broadcasting issues advisory to all Media channels to refrain from showing live coverage of defence operations and movement of security forces in the interest of national security
“In the interest of national security, all media platforms, news… pic.twitter.com/AASdtbFgTd
— ANI (@ANI) April 26, 2025
‘बंजारा’तील जबरदस्त गाणे प्रदर्शित! स्नेह, सक्षम, आदित्य म्हणतात ‘होऊया रिचार्ज’
मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे की, देशाची राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता सर्व वृत्त वाहिन्या, वृत्त संस्था आणि सोशल मिडीया वापरकर्ते यांना सुचित करण्यात येते की, तुमच्या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर आणि जबाबदारीने करा. सुरक्षा वृत्तांकन करताना कायदे आणि नियमांचं पालन करा.असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
मोठी बातमी! राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी होणार
त्यामुळे आता पहलगाम हल्ल्याबाबतचे कव्हरेज करताना वृत्त वाहिन्यांना रिअल टाईम कव्हरेज करता येणार नाही, व्हिज्युअल्सचा प्रसार किंवा स्त्रोत देऊन कव्हरेज करा. संवेदनशील माहिती कारवाय करण्याच्या आधीच प्रसारित केल्याने विरोधी पक्षालाा मदत होऊ शकते. तसेच सुरक्षा रक्षकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.