Download App

Lok Sabha 2024 : “..तरच आम्ही लोकसभेत भाजपसोबत राहू”; बच्चू कडूंचा कोंडी करणारा इशारा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने मतदारसंघांची (Lok Sabha Election 2024) चाचपणी आणि जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी नेतेमंडळींनी दबावाचं राजकारण सुरू केलं आहे. आपल्या वक्तव्यांनी सरकारची अडचण करणाऱ्या आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत मित्र पक्षांची समजूत काढताना सत्ताधाऱ्यांची मोठी कसरत होणार असल्याचे दिसत आहे. ‘शेतकऱ्यांच्या सोयीचं राजकारण आम्ही करू. भाजपाला लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा आहे. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच आम्ही लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर राहू’, असा इशारा कडू यांनी दिला आहे.

Bachhu Kadu : पवारांना निमंत्रण अन् बच्चू कडूंचा मविआमध्ये जाण्यास ग्रीन सिग्नल? पाहा फोटो

बच्चू कडू आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कडू पुढे म्हणाले, यानंतर मी आता 20 तारखेला एक पत्रकार परिषद घेणार आहे. छगन भुजबळ आणि आरक्षणाबाबत काय बोलायचं हे ठरवलं आहे. माझी सगळ्या समाजाला विनंती आहे की माझ्यासह सर्व नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. निवडणुका जवळ आल्या आहेत. धर्म आणि जातीची लढाई मी पाहत आहे. यात हक्काची लढाई मागे पडत चालली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणीही कडूंनी भाष्य केले. बंदूक स्वतःसाठी, स्वहितासाठी काढू नका तर देशहितासाठी काढा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर कडू म्हणाले, हे राजकारण आहे. याला काहीच अर्थ नाही. मीडियासमोर मागणी करून गुन्हे दाखल होत नाहीत. त्यासाठी लेखी पत्र द्यायला हवे होते. त्यांचे आमदार खासदार आहेत. त्यांनी विधानसभेत आणि लोकसभेत प्रश्न उपस्थित करावेत असे प्रत्युत्तर कडू यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिले.

किंडल अन् टिंडरमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती गोंधळले; अचानक बदललं कोर्टरूमचं धीरगंभीर वातावरण

शेतकऱ्यांच्या सोयीचं राजकारण आम्ही करू. भाजपाला लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा आहे. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच आम्ही लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर राहू. नाहीतर आम्ही अमरावती आणि जळगाव याठिकाणी निवडणुका लढू.  या गोष्टी आजच निश्चित झाल्या तर आम्ही भाजपबरोपबर राहू. आम्ही लोकसभेसाठी नाही तर विधानसभेसाठी प्रयत्न करत आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले.

 

follow us