अहमदनगर – नगर दक्षिणेमधून महायुतीकडून सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुजय विखे हे आज लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आपला अर्ज दाखल करणार आहे. विखेंना पाठबळ देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विखे आज सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
Maldives Election: मालदीवमध्ये मुइझ्झूंचा मोठा विजय! पीएनसीने 93 पैकी 66 जागा जिंकल्या
सुजय विखे आज (22 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी महायुती मधील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सकाळी 10 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमणार आहेत. येथून महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली नगर शहरातून फिरणार आहे. या निमित्ताने महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वातावरणात मोठा बदल
असा असणार रॅली मार्ग
अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यांनतर माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक- तेलीखुंट, चितळे रोड, दिल्लीगेट ते निलक्रांती चौकात रॅली येणार आहे. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.
सदाशिव लोखंडेंही आजच अर्ज दाखल करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नगर जिल्हा दौऱ्यावर असल्याने महायुतीचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार असलेले सदाशिव लोखंडे हे देखील आज अर्ज दाखल करणार आहे. दरम्यान शिर्डीमधून लोखंडे यांचे प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केला आहे. तर वंचितकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उत्कर्षा रुपवते या देखील शिर्डी मतदार संघातून 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.