दहा वर्षांच्‍या काळात कृषी क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनवंण्‍याचं काम झालं -सुजय विखे

दहा वर्षांच्‍या काळात कृषी क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनवंण्‍याचं काम झालं -सुजय विखे

Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना झाला असून, या योजनेचे सुमारे 56 कोटी 47 लाख रुपयांचं अनुदान बँक खात्‍यात वर्ग झालं असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे. (PM Modi) तसंच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Sujay Vikhe Patil ) सक्षम बनवण्‍यासाठी सुरु केलेल्‍या योजना महत्‍वपूर्ण असल्‍याचा दावाही विखे पाटील यांनी यावेळी केला.

 

दरवर्षी सहा हजार रुपये

दहा वर्षांच्‍या काळात कृषी क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनवंण्‍याचं काम केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून झालं आहे. कृषी क्षेत्रासाठी घेतलेल्‍या प्रत्‍येक निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. किसान सन्‍मान योजनेच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्‍याचा निर्णय झाला. मागील पाच वर्षे ही योजना अखंडीत सुरु आहे. जिल्‍ह्यातील 2 लाख 82 हजार 379 शेतकऱ्यांना 56 कोटी 47 लाख 4 हजार रुपयांचं अनुदान मिळालं असल्‍याचा दावाही विखे पाटील यांनी यावेळी केला.

 

नुकसान भरपाई देण्‍यात आली

एकाच छताखाली शेकऱ्यांना शेती विषयक ज्ञान मिळाव यासाठी किसान समृध्दी केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. तसंच, नैसर्गिक आपत्‍तीमध्‍येही केंद्र आणि राज्‍य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीलं आहे. अतिवृष्‍टीमध्‍ये नुकसान झालेल्‍या मतदार संघातलील 3 लाख 25 हजार 286 शेतकऱ्यांना 365 कोटी 65 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्‍यात आली असल्‍याचंही त्‍यांनी यावेळी सांगितलं.

 

ऊसाच्‍या हमीभावातही सातत्‍याने वाढ

सहकार मंत्रालय स्‍थापन करुन, केंद्र सरकारने एैतिहासिक निर्णय घेतला आहे. हे मंत्रालय सुरु झाल्‍यानंतर सहकारी साखर कारखान्‍यांवर वर्षानुवर्षे लादण्‍यात आलेला आयकराचा बोजा कमी करण्‍याचा निर्णय झाल्‍यामुळेच राज्‍यातील आणि जिल्‍ह्यातील सहकारी साखर कारखानदारी टिकून आहे. केंद्र सरकारने ऊसाच्‍या हमीभावातही सातत्‍याने वाढ केली असंल्याचंही विखे पाटील म्हणाले.

 

प्रमुख पिकांसाठी हमीभावाची शाश्‍वती

ग्रामीण भागाच्‍या अर्थकारणाला सहाय्यभूत ठरणाऱ्या प्राथमिक सोसायट्यांना सहकार मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून आता नवी ओळख निर्माण करुन देण्‍याचं काम होत असून, धान्‍य गोदामांची उभारणी करण्‍यासाठीही प्राथमिक सोसायट्यांना सहकार्य करण्‍याची भूमीका आहे. तसंच, प्रमुख पिकांसाठी हमीभावाची शाश्‍वती देताना अन्‍य 22 उत्‍पादीत पिकांनाही हमीभाव देण्‍याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्‍प पत्राच्‍या माध्‍यमातून दिली असल्‍याचं डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज