Download App

जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही, लंकेंच्या बाकेकिल्यात विखेंची तोफ

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe Patil : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही. असं म्हणत अहमदनगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती केली आहे. आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्‍या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींना जनता तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्‍वासही विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी यावेळी व्‍यक्‍त केला आहे. (Nilesh Lanke) ते पारनेर येथे आयोजित सभेत बोलत होते.

 

सर्वसामांन्‍य लोकांमध्‍ये खदखद

यावेळी विखे यांनी देशामध्‍ये पुन्‍हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे असा विश्वास व्यक्त करत, जनतेने ज्‍यांनी राम मंदिराबाबात दिलेलं आश्‍वासन पूर्ण केलं त्‍यांनाच पुन्हा सत्तेवर बसवण्‍याचा निर्धार केला आहे असा विश्वास विखे यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच, पारनेर तालुक्‍यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्‍याचा प्रयत्न झाला. मागील साडेचार वर्षात ज्‍या गोष्‍टी तालुक्‍यात घडल्‍या त्‍यातून युवकांची हेळसांडच झाली. त्यामुळे आता सर्वसामांन्‍य लोकांमध्‍ये निर्माण झालेली खदखद आणि झालेला त्रास बाहेर येवू लागलाय असं म्हणत विखे यांनी अप्रत्यक्षपणे लंके यांच्यावर निशाणा साधाला.

 

तालुक्‍यात काय चालंलय हे सर्वांना माहीती आहे

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, विजय औटींसारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्‍यासाठी पुढे आलाय. हा मोठा आधार पारनेरच्‍या जनतेला मिळाला आहे. तसंच, तालुक्‍यात काय चालंलय हे सर्वांना माहीती आहे. अन्‍यायकारक मोठ्या घटना येथे सातत्‍याने घडत आहेत. असा आरोपही विखे यांनी यावेळी केला. मात्र, या शहराच्‍या पाणी योजनेसाठी येणाऱ्या काळात आपल्‍याला काम करायचं आहे. शहराची पाणी योजना पूर्ण करण्‍याचा शब्‍द मी देत असून, मी जो शब्‍द देतो तो पूर्ण करतो असा दावाही विखे यांनी यावेळी केला.

 

व्यक्तिगत नाही तर कामांवरून टीका करावी

सर्व युवकांनी संयमाने राजकारण करावं. युवकांचं भविष्‍य खूप महत्‍वाचं आहे. त्‍यांच्‍यासाठी आपल्‍याला काम करायचं आहे. रोजगाराची संधी निर्माण करणं हे आपलं उदिष्‍ट असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगाराची संधी निर्मिती करण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात आला आहे, अशी माहितीही विखे यांनी यावेळी दिली. तसंच, व्यक्तिगत टिका करण्‍यापेक्षा विकासाच्‍या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्‍याची आवश्‍यकता आहे असा टोलाही विखे यानी लंके यांना नाव न घेता लगावला. तसंच, या मतदार संघातील जनता सुज्ञ असून, विकासाच्‍या आणि विचारांच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्‍याची परंपरा या निवडणूकीतही कायम राहील अशी आशाही त्यांनी यावेळी व्‍यक्त केली.

follow us