‘तुम्हाला स्वकीय सोडून गेले, आधी आत्मपरिक्षण करा’; विखेंचेही पवारांना रोखठोक उत्तर

Radhakrishna Vikhe replies Sharad Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी लंकेंचा प्रचाार तर केलाच सोबतच विखे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले. त्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आता […]

फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला

फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला

Radhakrishna Vikhe replies Sharad Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी लंकेंचा प्रचाार तर केलाच सोबतच विखे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले. त्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आता त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची काळजी करावी. ते काय बोलतात याला मी जास्त महत्व देत नाही. खोटं बोल पण रेटून बोल हाच त्यांचा धंदा आहे, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे यांनी केली.

शरद पवार भाषण करत होते, अचानक कुणीतरी अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने पकडली

राधाकृष्ण विखे आज शिर्डीत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांच्या राजकारणात तरी कुठे सातत्य आहे. ते कधी पहाटेचा शपथविधी करायला सांगतात तर कधी भाजपला पाठिंबा देऊन नंतर पाठिंबा काढून घ्यायला सांगतात. विदेशी मुद्द्यावर आधी काँग्रेसशी फारकत घेतात नंतर पुन्हा ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पायाशी जाऊन बसतात. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला राजकारण करायची परवानगी आहे, त्यामुळेच तुम्हाला स्वकिय सोडून गेले. आता आत्मपरिक्षणाची खरी गरज तुम्हाला आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी केली.

मी तर म्हणतो शरद पवार यांनी नगरमध्ये जास्तीत जास्त सभा घ्याव्यात म्हणजे मग आम्हालाही सांगता येईल की त्यांनी नगर जिल्ह्याचं वाटोळं कसं केलं. ते स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवून घेतात पण स्वतःच्या पक्षाचे दहा उमेदवारही देता आले नाहीत. काँग्रेसचीही तशीच अवस्था झाली आहे. बाळासाहेब थोरातांनाही नगर जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही आणि स्वतःला नेते म्हणवून घेतात अशी टीका त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.

‘त्यांचा पक्षांतराचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला ठाऊक’ विखेंच्या आरोपांवर पवारांचा सणसणीत टोला

त्यांचा पक्षांतराचा पराक्रम जिल्ह्याला ठाऊक : पवार

याआधी शरद पवार म्हणाले होते, की ज्या नेत्यांचा उल्लेख तुम्ही केला त्यांच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. विखेंविरोधात प्रचार हा त्यांचा धर्म असल्याची टीका राधाकृष्ण विखेंनी केली होती. ते काय बोलतात हे मला माहिती नाही. कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता तर भाजपमध्ये आहेत. आता हा त्यांचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला.

Exit mobile version