Download App

आजी-माजींच्या काळात शिर्डीचा विकास थांबला; उत्कर्षा रुपवतेंचा हल्लाबोल

एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही.

Shirdi Lok Sabha Election : एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व (Shirdi Lok Sabha Election) केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही. मला रोखण्यासाठी माझ्या कारवर हल्ला केला. माझे प्रचाराचे बॅनर फाडण्यात आले ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मात्र जनता माझ्यासोबत आहे यामुळे विजय निश्चित माझा आहे असा विश्वास उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदासंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांची जाहीर सभा झाली. संगमनेर शहरातील कुरण रोडवर ही सभा पार पडली. यावेळी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, डॉ. किरी, अनिल जाधव, संदीप मोकळ, अजिज ओहरा आदी उपस्थित होते.

शिर्डी लोकसभा : उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचाराला संगमनेरात सुरुवात

या सभेत उत्कर्षा रुपवतेंनी आजी माजी खासदारांवर टीकेची झोड उठवली. एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डीचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही. हायमॅक्स दिवे व सभामंडप बांधून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. या डोंगराचे पाणी इकडे आणू त्या डोंगराचे पाणी तिकडे आणू केवळ दहा वर्षात हवेत विकास केला. शिर्डी लोकसभेच्या प्रचारादरम्यान अकोले तालुक्यातील राजूर येथे माझ्या कारवर हल्ला करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागात माझ्या प्रचाराचे बॅनर फाडण्यात आले ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे रुपवते म्हणाल्या.

लोकशाहीत तरुण उमेदवार येऊ इच्छितो शिवाय एक महिला तरीही ते स्वीकारण्यास प्रतिस्पर्धी तयार नाहीत. मी शिर्डी लोकसभा निवडणूक एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून लढत आहे. माझा विजय निश्चित आहे. कारण माझ्याबरोबर जनता आहे असे उत्कर्षा रुपवते यावेळी म्हणाल्या.

मोठी बातमी! उत्कर्षा रुपवतेंच्या वाहनावर दगडफेक; हल्लेखोर पसार, पोलिसांत तक्रार

शिर्डीत तिरंगी लढत

महायुतीकडून दोन टर्म खासदार सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार आहेत. शिर्डीत दुरंगी लढत होईल, असे वातावरण होते. परंतु आता रुपवते याही लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता तिहेरी सामना होणार आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us