अहमदनगर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections) निमित्ताने जोरदार तयारी सुरु केली असून पारनेर तालुक्यात महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याच्या निमित्ताने मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आज दुपारी पार पडणार आहे, माहिती तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.
मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून पारनेरच्या तहसीलदार कार्यालयाजवळील पानोली चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज मंगळवार सकाळी ११:३० वाजता मेळावा होणार आहे असे डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाकळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले तसेच तालुक्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत.
Parner Assembly : पारनेरची जागा ठाकरेंना जाणार? शिवसैनिकाने लंकेना आठवण करून दिला लोकसभेतील शब्द
पारनेर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसैनिकांनी डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला महाविकासआघाडीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे आता शिवसेनेला पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी शिवसैनिक कामाला लागले असून त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांत संपूर्ण तालुका पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली काढलेल्या मशाल यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांनी पिंजून काढला आहे.
मशाल यात्रेला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने शिवसैनिक मोठ्या जोमाने गावागावात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी करत आहेत व याचाच भाग म्हणून महाराष्ट्र अस्मिता मेळावा पारनेरला भव्यदिव्य प्रकारे होणार असल्याची माहिती महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी यांनी दिली.
लोकसभा निवडणुकी दरम्यान महाविकासआघाडीतील वरीष्ठ नेत्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) खासदार झाल्यावर विधानसभेची पारनेर-नगरची जागा शिवसेनेला देण्याचा शब्द दिला होता आणि त्यांचा शब्द ते कायम सार्थ करतात असाही सर्वांना अनुभव असल्याने ते महाविकासआघाडीतील मोठ्या भावाची भुमिका विधानसभेला निभावतील व शिवसेनेला संधी देण्यासाठी पुढाकार घेतील असा मला ठाम विश्वास असल्याचे मत डॉ.श्रीकांत पठारे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.
फोन फिरवणार तेवढ्यात वाटलं नेम चुकला तर.. नेम चांगलायच्या चर्चांमध्ये ठाकरेंचं स्पष्टीकरण